
पहिला गुरू
माझी आई
संस्कारांची वाट
ती देई।।१
बाबा माझे
गुरू दुसरा
जीवनाचे तत्वज्ञान
दावी चेहरा ठेवून हसरा।।२
माझ्या आयुष्यात
आले गुरू वेगवेगळ्या रुपात
शिकवले त्यांनी मजला
राहावे कसे आनंदात।।३
गुरुवर्य माझे
गजानन स्वामी शेगावचे
दिली त्यांनी शिकवण
कधीच नाही रडायचे।।४
कितीही येवो संकट
हसत हसत सामोरे जायचे
गुरुच देतो बळ
स्वतःला सावरायचे।।५
मानसी बापट
बंगलोर














