prabodhini news logo
Home कविता प्रबोधिनी मंच महाराष्ट्र समूह तर्फे आजची कविता – गुरुपौर्णिमा

प्रबोधिनी मंच महाराष्ट्र समूह तर्फे आजची कविता – गुरुपौर्णिमा

0
142

गुरुपौर्णिमा दिवशी
करु गुरुला वंदन
घडवला देह त्यांनी
बनवले चंदन

होते मी मातीचा गोळा
मायबापांनी मला
दाखवली शाळा
गुरुजनांनी मला लावला लळा

गुरुशिवाय गती मला
नाय रे गड्या
गुरु माझा आधार
माझ्या लपविल्या खोड्या

गुरुची वाणी खरी
ध्यानात घ्याना
गुरुच्या शब्दाला
मान तुम्ही द्याना

दत्तगुरु हे जगी थोर
तीन देवांचा तो अवतार
त्यांचा होता निसर्ग गुरु
तेच असती जीवनाचा आधार

सौ. सुनंदा वाळुंज
ठाणे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here