
नुकतीच एक घटना घडली. मिनू खूप हसमुख चेहऱ्याची तिच्या चेहऱ्यावर सदा हास्य असायचे .तीचे आई वडील लहानपणीच एका अपघातात गेले होते.तिचे मोठे आई वडिलांनी तिची जोपासना केली.आणि खूप लाडात वाढविले.तिचे शिक्षण झाले मुलगी २४ वर्षाची झाली होती. छान सरकारी नोकरी असलेला मुलगा पाहून तिचं लग्न आटोपून दिले.चेहरा हसमुख आणि दिसायला पण खूपच सुंदर होती.तिची सौंदर्य तिला अडचणीचे कारण बनले.आई वडील नव्हते त्याची पोकळी तर आयुष्यात कोणी भरून काढू नाही शकले.पण तिला नवरा मिळाला तो तिच्यावर संशय घेणारा होता तिने स्वतःच्या मोठ्या आईला सांगितले एक दोन वेळा पण तिला वाटले आज बरे होईल उद्या बरे होईल.पण त्याच्या जे देणारे त्रास जो आहे दिवसेंदिवस वाढू लागला.तो घरात आपल्या पत्नीला ठेवून बाहेरून कडी लावायचा आणि खुले तार तिथे ठेवायचा .थोडे पाण्याचा संचय सुद्धा असायचा म्हणजे ती मुलगी बाहेर निघाली तर तिला इलेक्ट्रिक चा झटका लागला पाहिजे.तिचा तो त्रास तिला आत्महत्या करण्यास मजबूर झाली असावी किंवा त्या तिच्या नवऱ्याने केला असावा.तिने गळफास घेतला व आपले आयुष्य संपवले.यात चुकी कुणाची म्हणता येईल .तिच्या मोठ्या आई वडिलांची,तिची किंवा तिच्या नवऱ्याची ही विचार करण्याची बाब आहे.तिची ती मौन राहण्याचा जो पर्याय तिने निवडला तो अखेरीस तिचाच जीव उध्वस्त झाला.
अडचण होत असेल जिवाला
मौन तो तोडलाच पाहिजे
जीवन मिळते एकदाच त्याला
व्यर्थ गमावले नाही पाहिजे.
रंजना भैसारे, नागपूर















