
गणेश शेंडे घुगुस 9764890809 – घुगुस येथील लोकसंख्या आज घडीला जवळपास चाळीस ते पन्नास हजार जवळ आहे. यामुळे नव्याने ग्रामपंचायत येवजि येथे नगरपरिषद निर्माण झाली त्यामुळे या परिसरात नागरिकांचे आवागमन वाढत आहे व नागरिकांसोबत येथे मोकाट जनावरांचे प्रमाण वाढल्यामुळे परिसरात शिवाजी चौक ते बाजार चौक ते गांधी चौक ते पोडा मैदान परिसरात नेहमी मोकाट जनावरे रस्त्यावर बसून असतात व त्याच ठिकाणी सेंण टाकून दुर्गंधी पसरत आहे यामुळे पूर्वीच पावसाळा सुरू असून पावसामुळे नाना प्रकारचे डास मच्छर कीटक हे परिसरात रस्त्यावर फिरत राहतात यामुळे मानवी जीवनाला नेहमीच हानी होण्याची शक्यता राहते व त्यातल्या त्यात भराभर आता हे जनावरे 24 तास रस्त्यावर बसून राहतात व यामुळे त्या ठिकाणी ते सेन सुद्धा टाकतात त्यामुळे त्या परिसरात नागरिकांना दुर्गंधीचा सामना करावा लागतो व तसेच तासंतास जनावर बसून असल्यामुळे त्या ठिकाणी ये जा करणाऱ्या गाड्यांना नागरिकांना खूप त्रास सहन करावा लागतो यामुळे सन्माननीय सुधाकर भाऊ बांदुरकर साहेब ग्रामपंचायत माजी उपसरपंच यांनी स्थानिक प्रशासनाचे मुख्याधिकारी निलेश जी राजणकर सर यांना दिनांक 10 ,7 2025 ला पत्र देऊन सूचना केली की आपण ताबडतोब रस्त्यावरील जनावरे यांची व्यवस्था करण्यात यावी व सदर घाण आपल्या कर्मचाऱ्यामार्फत स्वच्छ करून परिसर सुजलाम सुफलाम करावा अन्यथा जनतेच्या हितासाठी आम्हाला रस्त्यावर उतरून आंदोलन करावे लागेल असे एका निवेदनाद्वारे सुधाकर जी बांदूरकर व गावकरी यांच्या वतीने निवेदन देण्यात आले.















