
घुग्घुस येथील अमराई वार्ड उडिया मोहल्ला परिसरात दि.१४ जुलै २०२५ सोमवार रोजी चंद्रपूर मतदारसंघातील लोकप्रिय आ.किशोरभाऊ जोरगेवार यांच्या स्थानिक विकास निधीतून शौचालय नूतनीकरणाचे उद्घाटन तुळशी वृंदावन संस्थाचे अध्यक्ष महेंद्र बाग व जेष्ठ भाजप नेते यांच्या हस्ते करण्यात आला.
तसेच महेंद्र बाग हे सामाजिक काम अनेक वर्षांनुवर्षे करण्यात येत आहे,तेथील परिसरातील लोकांना तिरपाल,छत्री व दवाखान्याचे सतत कामे करत असतात.

यावेळी भाजप नेते श्याम आगदारी, माजी.सरपंच राजकुमार गोडशेलवार, माजी बहुजन महिला शहर अध्यक्षा सौ.उषाताई आगदारी,शिवसेना (शिंदेगट) अध्यक्ष महेश डोंगे,नवीन मोरे,स्वप्नील वाढई, रमण तांड्रा,बंशी महाकाली,पृथ्वीराज आगदारी, वनिता निहाल,ज्योती बावरे,संध्या जगताप,शारदा पोनाला, माया मांडवकर,सुनिता पाटील, सुशीला डकरे, व भाजपाचे जेष्ठ नेते,पदाधिकारी तसेच माजी ग्रा.पं.सदस्य आदी उपस्थित होते.















