prabodhini news logo
Home चंद्रपूर प्रलंबित मागण्याकरिता महामिनरल्स कामगारांचे आंदोलन…

प्रलंबित मागण्याकरिता महामिनरल्स कामगारांचे आंदोलन…

0
119

नम्रता सरदार मुख्य संपादिका प्रबोधिनी न्युज – महा मिनरल्स बेनिफिकेशन अँड मायनिंग मध्ये कार्यरत कामगारा कडून अनेकदा कंपनी प्रशासनाला कामगारांच्या मूलभूत आणि आवश्यक मागण्या पूर्ण करण्यासाठी मागणी पत्र देण्यात आले होते. पण संबंधित कंपनीकडून कामगाराच्या मागन्याला विशेष प्रतिसाद न देता टाळाटाळ करून कंपनी ने वेळ काढू धोरण अवलंबले होते. त्यामुळे कामगारांना नाईलाजास्तव कंपनी प्रबंधना विरोधात आज पासून कामगन बंद आंदोलन सुरू करावे लागले आहे.
कामगारांच्या मागणी पत्रामध्ये पिण्याच्या पाण्याची सुविधा, कामगारांचा ई.पी.एफ. आणि ई. एस. आय. सी. मध्ये नियमिततता, वेतन वाढ, कामगारांचे ग्रेडेशन, कंत्राट दाराकडून कामगारांची होणारी पिळवणूक तसेच कामाचे तास इत्यादी मूलभूत मागण्याचा समावेश होता. आणि जोपर्यंत कामगारांच्या मागण्या पूर्ण होणार नाही, तोपर्यंत कामगारांचं काम बंद आंदोलन अविरत चालू राहील.
सदर आंदोलन हे विजयक्रांती कामगार संघटनेच्या अध्यक्ष – शिवानी वडेट्टीवार यांच्या मार्गदर्शनात, व जिल्हाध्यक्ष – राष्ट्रीय मजदूर संघ (इंटक) महाराष्ट्र राज्य तथा विजयक्रांती कामगार संघटनेचे कार्याध्यक्ष – मा. प्रवीण लांडगे यांच्या नेतृत्वात तसेच विजय क्रांती कामगार संघटनेचे महासचिव मंगेश आसुटकर उपाध्यक्ष प्रदीप ठाकरे, कार्यालयीन प्रमुख- सतीश शेंडे, प्रदीप डाखोरे, मिलिंद कांबळे , जावेद कुरेशी, इतर सर्व कामगारांच्या सहकार्याने कामगारांनी स्वतःच्या न्याय व हक्कासाठी उपस्थित केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here