
संघर्ष भगत झरि जामनी प्रतिनिधी : मौजे अडेगाव तालुका झरी जामणी जिल्हा यवतमाळ येथे नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प अंतर्गत कापूस पिकाची शेती शाळा अडेगाव येथील प्रगतिशील शेतकरी दत्ता लालसरे यांच्या शेतात घेण्यात आली सदर शेती शाळेमध्ये उपविभागीय कृषी अधिकारी निघोट, तालुका कृषी अधिकारी दासरवार, मंडळ कृषी अधिकारी इंगोले आणि मंचलवार तथा उपकृषी अधिकारी पवार आणि अडेगावचे सहाय्यक कृषी अधिकारी सोनाळे आणि गावातील शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सदर शेती शाळेमध्ये कापूस पिकावरील विविध रोग व किडीचे व्यवस्थापन तथा नियंत्रण याबद्दल सविस्तर माहिती तालुका कृषी अधिकारी आणि उपविभागीय कृषी अधिकारी तथा मंडळ कृषी अधिकारी यांनी शेतकरी बांधवांना दिली..















