
प्रशांत रामटेके संपादक प्रबोधिनी न्युज – परभणी (दि. १९ जुलै) – राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी परभणी जिल्ह्याच्यावतीने आयोजित “निर्धार नवपर्वाचा पदाधिकारी संवाद मेळावा” आज अक्षदा मंगल कार्यालय, परभणी येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या मेळाव्याला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मा. खा. सुनील तटकरे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
या प्रसंगी मार्गदर्शन करताना तटकरे साहेबांनी सांगितले की, “शेतकरी, कष्टकरी, कामगार, माता-भगिनींच्या हितासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नेहमीच कटीबद्ध राहिला आहे. अजित दादांच्या नेतृत्वात राज्यात शेती, सहकार, आरोग्य, शिक्षण, उद्योग आदी क्षेत्रांमध्ये ठोस निर्णय घेतले गेले असून विकासाभिमुख भुमिका पक्षाने कायम ठेवली आहे.”

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा विचार करता कार्यकर्त्यांनी संघटन बळकट करावे, तळागाळातील जनतेशी संपर्क वाढवावा, राष्ट्रवादीच्या विचारांची नोंदणी घरोघरी करावी, असे आवाहनही तटकरे साहेबांनी यावेळी केले.
कार्यक्रमास विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती लाभली. उपस्थित मान्यवरांमध्ये
महिला प्रदेशाध्यक्षा रूपाली चाकणकर, माजी मंत्री धनंजय मुंडे, आमदार राजेश विटेकर, आमदार आनंद परांजपे, युवक प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण, आमदार विक्रम काळे, माजी आमदार विजयराव भांबळे, प्रताप देशमुख, सुनील मगरे, कल्याणराव आखाडे, शहर जिल्हाध्यक्ष प्रताप देशमुख, लतीफ तांबोळी, महिला जिल्हाध्यक्षा भावना नखाते, युवक जिल्हाध्यक्ष रोहन सामाले, विद्यार्थी आघाडी जिल्हाध्यक्ष दीपक भैय्या वारकरी, शहराध्यक्षा नंदाताई राठोड, रणजीत नरूटे, झाकीर लाला, अक्षय देशमुख आदींसह पक्षाचे वरिष्ठ नेते, पदाधिकारी, सर्व सेलचे प्रमुख, सरपंच, उपसरपंच, नगरसेवक, लोकप्रतिनिधी व पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रस्ताविक राष्ट्रवादी शहर जिल्हाध्यक्ष प्रताप भैया देशमुख यांनी केले.
सुत्रसंचालन सिद्धेश्वर सोळंके, वैरागर यांनी प्रभावीपणे पार पाडले, तर आभारप्रदर्शन रामेश्वर आवरगंड यांनी केले.















