
ह्या श्रावण महिन्यात
रिमझिम पाऊस पडतो
माता कानबाई बसते
खुदकन गालात हसते
शिवशंभु डमरू वाजतो
देवबाप्पा तपाला बसतो
नाद शंभु देवाचा घुमतो
माळ ऋृद्राक्षाची घालतो
श्रावण वद्य अष्टमीला
प्रभु धरणी अवतरला
बाळ नंद यशोदेला दिला
कंस वध श्रीकृष्णाने केला
हिरवळीचे पीक डोलती
काळ्या मातीचा सुगंध
शेतकरी राजा आंनदी
झाडे वेली पक्षी बेधुंदी
सौ सुनिता कोठावदे पिंपळनेर















