
तिचं फुलण्याचं काम तिनं चोख केलं
जन्माला येऊन अस्तित्व सिद्ध केलं
वास नाही म्हणून निषिद्ध केलं
तर हिरमुसून फुलणं नाही सोडलं
वेगवेगळ्या रंगानी रूप खुलतच गेलं
जरी कौतुक तिचं कुणी नाही केलं
सदाफुलीनं जन्माला येणं नाही सोडलं
नाकारणाऱ्यांनी त्याचं काम चोख केलं
निसर्गनियमाने जन्माला येणं त्यानं ठरवलं
सदाफुलीने फुलण्याचं चक्र नाही थांबवलं
पृथ्वीवर येण्या जाण्याचं नियोजन ठरलेलं
मानव वा इतरेजनांना रोखता नाही आलं
नीला चित्रे,चिंचवड, पुणे















