prabodhini news logo
Home कविता प्रबोधिनी मंच साहित्य समूह तर्फे आजची कविता – श्रावण

प्रबोधिनी मंच साहित्य समूह तर्फे आजची कविता – श्रावण

0
116

आला सजून श्रावण
धरा नटून बसली
फुलं माळून वेणीत
गाली हळूच लाजली।।१।।

आला सजून श्रावण
ऊन सोनेरी जहाले
खेळ खेळत सावली
हसू गालावर आले।।२।।

आला सजून श्रावण
आता मोकळ्या रानांत
हित गुज सांगे पक्षी
एकमेकांच्या कानात।।३।।

आला सजून श्रावण
सुख आले धरतीला
नवी नटली नवरी
शालू हिरवा नेसला।।४।।

आला सजून श्रावण
ऊन पाऊस खेळतो
एक चिमुकला दीप
लक्ष अंधार जाळतो ।।५।।

आला सजून श्रावण
मन मोहरून गेले
थेंब पावसाचे येता
सुख अंगणात आले।।६।।

प्रा.समिंदर निवृत्तीराव शिंदे, लातूर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here