
दिसले नाही कधी तुला…
मनातील भाव माझ्या..
कळली नाही व्यथा तुला…
हसण्यातील सल माझ्या…
आजही जपते मी
भांगा मधली लाली….
ओळख तुझीच आहे
अंखड सौभाग्याची…
तोडून सगळे पाश बांध
उंबऱ्या त आले मी..
एक नवे आयुष्य आता
नवा डाव मांडते मी…
होतील का स्वप्ने पुरी
गवसतील का सूर हवे…
ओळख माझीच मला
होईल का पुन्हा नव्याने…
असते शोभा मी अंगणाची
ओळख असते तुझीच मी
करते राखणं कुंकवाची..
ताकद तुझ्या उमेदीची मी
स्त्री जन्मा ही तुझी कहाणी…
तुझ्या शिवाय असे अधुरी…
तूच तुझ्या जीवनाची गाथा
तुझ्या विना घरदार पोरकी….
आशालता भोसले
इंदापूर पुणे जिल्हा.















