
जगदीश वडजे
(नाशिक जिल्हा विशेष प्रतिनिधी)
म.वि.प्र.समाज संचलित,जनता विद्यालय व अभिनव बाल विकास मंदिर वरखेडा,विद्यालयात *शैक्षणिक वर्ष 2025-26 साठी विज्ञान छंद मंडळाची स्थापना* करण्यात आली. *विद्यालयाच्या मा.मुख्याध्यापिका श्रीम.सविता शिंदे मॅडम, मा.पर्यवेक्षक श्री.नितीन भामरे सर* यांच्या अध्यक्षतेखाली तसेच मार्गदर्शनाखाली इयत्ता पाचवी ते दहावीचे प्रत्येक वर्गातील दोन विद्यार्थी निवड करून त्यातील विद्यार्थ्यांची लोकशाही पद्धतीने निवड करून विज्ञान छंद मंडळाची स्थापना करण्यात आली.
‘विज्ञान हेच आपल्या जीवनाचे अविभाज्य अंग आहे,असे समिती प्रमुख *श्री.शाम बोराडे सर* यांनी आपल्या प्रास्ताविकात सांगितले.
विज्ञानछद मंडळाचे उद्घाटन *कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री.प्रकाश नाना भुसाळ* यांच्या उपस्थितीत झाले.*दीप प्रज्वलन व सरस्वतीचे आणि डॉ.सी.व्ही.रामन* यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यानंतर विद्यालयाच्या गीत मंचाने विज्ञान गीत सादर केले.विज्ञान शिक्षिका *श्रीम.वृषाली रौंदळ मॅडम* यांनी विज्ञान प्रतिज्ञा विद्यार्थ्यांकडून वदवून घेतली.
विद्यालयातील *नंदिनी थोरमिसे,ईश्वरी पडोळ, ईश्वरी उफाडे,ओवी गायकवाड,आराध्या वडजे व समीक्षा भगरे* या विद्यार्थिनींनी *प्रत्यक्ष प्रयोगाद्वारे प्रात्यक्षिक करून सर्वांना प्रत्यक्ष अनुभव* दिला.
विज्ञानछंद मंडळाची उद्दिष्टे व कामे उपशिक्षिका *श्रीम.सरिता कांगणे मॅडम* यांनी आपल्या मनोगतातून सांगितले.
*कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रकाश नाना भुसाळ* यांनी विद्यार्थ्यांना नवनिर्मितीचा ध्यास घ्यावा,नवनवीन कल्पनांचा अविष्कार करावा,विद्यार्थ्यांनी आपल्या अंगी असलेल्या चिकित्सक कौशल्याचा वापर करून आणि प्रत्येक गोष्टीचे निरीक्षण करावे असे मार्गदर्शन केले. विद्यालयाच्या *मा.मुख्याध्यापिका श्रीम.सविता शिंदे मॅडम* यांनी,’विद्यार्थ्यांना विज्ञान विषयाबद्दलची गोडी निर्माण करण्यासाठी विविध उपक्रमांत सहभागी व्हावे तसेच आपल्या संशोधक वृत्तीला चालना द्यावी,असे सांगितले.आपल्या विद्यालयाचे *पर्यवेक्षक श्री.नितीन भामरे सर* यांनी आपल्या भाषणातून ‘विद्यार्थ्यांना सध्याचे युग हे विज्ञान व तंत्रज्ञानाचे युग आहे त्यासाठी प्रत्येकाने विज्ञानाची कास धरली पाहिजे असे आवाहन केले.
निवड झालेली नवीन कार्यकारिणी…
*1) अध्यक्ष-करण विशाल सवंद्रे*
*2) उपाध्यक्ष-आदित्य बाळासाहेब गायकवाड*
*3) कार्यवाहक-सृष्टी रवींद्र उफाडे*
*4) ग्रंथपाल-अभिराज रामराव उफाडे*
*5) प्रसिद्धी-तेजस खंडेराव उफाडे*
*6) सहल-साहिल सुनील गांगोडे*
*7) प्रदर्शन-प्रणाली माणिक गायकवाड*
*8) विज्ञान सभा-श्रेया आदिनाथ पडोळ*
*9) हस्तलिखित-प्रियंका भरत भुसाळ*
*10) विज्ञान व सांस्कृतिक- भूमी सागर सवंद्रे*
*11) वस्तुसंग्रहालय-सोमनाथ ज्ञानेश्वर सोनवणे*
*12) चित्रपट विभाग-ललित विजय गांगुर्डे*
*13) पर्यावरण विभाग- आराध्या अमोल वडजे*
विद्यार्थी कार्यकारणीत निवड झालेल्या पदाधिकारी विद्यार्थ्यांचे मान्यवरांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करण्यात आले.या *कार्यक्रमासाठी विज्ञान शिक्षक श्री.शाम बोराडे सर,ज्येष्ठ विज्ञान शिक्षिका श्रीम.सरिता कांगणे मॅडम,श्रीम. वृषाली रौंदळ मॅडम, श्रीम.मनीषा उफाडे मॅडम,श्रीम.योगिता उफाडे,श्रीम.सिमा गायकवाड मॅडम,श्री.नरेंद्र वड सर, कलाशिक्षिका श्रीम. सुवर्णा भोर मॅडम, प्रयोगशाळा सहाय्यक श्री.प्रवीण मोरे,श्री.प्रमोद जाधव* इतर सर्व सहाय्यक शिक्षकवर्ग व शिक्षकेतर कर्मचारी या सर्वांचे सहकार्य लाभले.
कार्यक्रमाचे *सूत्रसंचालन आणि आभार सृष्टी उफाडे व श्रेया पडोळ* यांनी संयुक्तपणे केले,विज्ञान छंद मंडळाची स्थापना व उद्घाटन कार्यक्रम आनंदात आणि उत्साहात पार पडला.















