prabodhini news logo
Home चंद्रपूर चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे नवनियुक्त अध्यक्ष रवींद्र शिंदे यांचा शिवसेना व युवासेनेच्या...

चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे नवनियुक्त अध्यक्ष रवींद्र शिंदे यांचा शिवसेना व युवासेनेच्या वतीने सत्कार

0
388

प्रशांत रामटेके संपादक प्रबोधिनी न्युज – चंद्रपूर : शिवसेना व युवासेना चंद्रपूर यांच्या वतीने सहकार क्षेत्रातील चाणक्य म्हणून ओळख असलेले मा. रवींद्र भाऊ शिंदे यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन भव्य सत्कार करण्यात आला.

रवींद्र शिंदे यांची नुकतीच चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली आहे. सहकार क्षेत्रातील त्यांच्या उत्तम नेतृत्वामुळे व प्रभावी कार्यशैलीमुळे सलग तिसऱ्यांदा अध्यक्षपदाची धुरा त्यांनी सांभाळली आहे, हे विशेष उल्लेखनीय आहे.

शिवसेना व युवासेनेच्या शिष्टमंडळाने भेट घेऊन त्यांचा सत्कार करत पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. जिल्ह्यातील सहकार क्षेत्रात त्यांनी निर्माण केलेला विश्वास आणि कार्यक्षमतेचा आदर्श पुढील पिढीसाठी प्रेरणादायी ठरणार आहे, असे शिवसेना पदाधिकाऱ्यांनी यावेळी सांगितले.

या प्रसंगी युवासेनेचे जिल्हाप्रमुख आलेख रट्टे, शिवसैनिक सुरज शाहा, युवा शिवसैनिक सुमित हस्तक, निखिल मांडवकर, भूषण जाधव, हर्षल खंगार उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here