prabodhini news logo
Home कविता प्रबोधिनी मंच महाराष्ट्र समुहा तर्फे मैत्री दिनानिमित्त विशेष कविता – मैत्री

प्रबोधिनी मंच महाराष्ट्र समुहा तर्फे मैत्री दिनानिमित्त विशेष कविता – मैत्री

0
100

मैत्रीचं नातं जगावेगळं असतं,
रक्ताचं नसलं तरी मोलाचं असतं.
मैत्री म्हणजे एक धागा रेशमाचा,
मनापासून मनापर्यंत जोडलेला.

मैत्री नाजूक फुला सारखी असते,
फुला प्रमाणे फुलवावी तशी फुलते.
मात्र या फुलाच्या पाकळ्या,
गळू न देणे आपल्या हाती असते.

आयुष्यात नवा दृष्टीकोन देते,
अंधारात दिशा दाखवते.
सुखाच्या क्षणात हात देते,
दुःखाच्या प्रसंगी हात होते.

मैत्री अमूल्य रत्न जीवनाचे,
त्याला कोंदण असते विश्वासाचे.
प्रतीक एकमेकांच्या अस्तित्वाचे,
सहवासाच्या सुखद अनुभुतीचे.

मैत्री असते नेहमीच खास,
एक अलगद स्पर्श मनाचा.
एक अनोखा ठेवा आठवणींचा,
सुखाचा एक धागा मैत्रीचा.

सौ. अंजली जोशी
चिंचवड

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here