
मैत्री म्हणजे सोनचाफा
सुगंधाने बहरलेला
बालपणीच्या आठवणींचा
रम्य खजिना जपलेला
माझी जिवलग मैत्रीण
खूप गोड गोजिरीA
तिची माझी घट्ट गट्टी
मखमली साजरी
आवड तिला गाण्याची
भावगीत म्हणण्याची
भातुकलीच्या डावात
स्वयंपाक बनवण्याची
माझ्या संगे माळावरती
मनमुराद भटकण्याची
गवतफुलांचा गंध लेवून
फुलपाखरी बागडण्याची
डब्यातला खाऊ नकळत
वाटून खायचा हसत खेळत
अभ्यास करायचा जोडीने
खेळायला जायचे पळत
स्वप्ने आमची रंगीबिरंगी
परी राज्यात जाण्याची
जादूच्या छडी सोबत
नभो मंडलात फिरण्याची
सौ.वंदना पाटील















