prabodhini news logo
Home चंद्रपूर चंद्रपूरमध्ये राज्यस्तरीय भव्य दिव्य बौद्ध-धम्म परिचय मेळावा आयोजित

चंद्रपूरमध्ये राज्यस्तरीय भव्य दिव्य बौद्ध-धम्म परिचय मेळावा आयोजित

0
625

चंद्रपूर शहरातील श्रमिक पत्रकार भवन, वरोरा नाकारोड, चंद्रपूर येथे दिनांक 10 ऑगस्ट 2025 रोजी रविवारी सकाळी 12 वाजता राज्यस्तरीय बौद्ध-धम्म परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे आयोजन बुद्धिष्ट मंगल परिणय ग्रुप, नागपूर यांच्यावतीने करण्यात आले असून, यामध्ये विदर्भातील प्रमुख बौद्ध नेते, कार्यकर्ते आणि अनुयायी मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत.

कार्यक्रमाचे प्रमुख संयोजक नरेंद्र गायकवाड असून, या उपक्रमाला सहयोग कल्याणकारी बहुउद्देशीय संस्था, नागपूर यांचे सहकार्य लाभले आहे. प्रमुख मार्गदर्शक म्हणून डॉ. दयारामजी गावडे (नागपूर), पुष्पलता ढोबळे (नागपूर) आणि प्रमोद सोमकुंवर (अध्यक्ष) उपस्थित राहणार आहेत.

या मेळाव्यातून विशेष करुन डॉक्टर, वकील, इंजिनिअर, क्लास-१,२,३ चे सरकारी अधिकारी,कर्मचारी, निमसरकारी प्रोफेसर, शिक्षक, मॅनेजर, उच्चशिक्षित, पदविधर, शेतकरी, व्यवसायिक आणि प्रथम वधु-वर, घटस्फोटीत, विधूर, विधवा, अपंग व समाजातील अनेक क्षेत्रातील स्थळे या ठिकाणी भेटतील.
बौद्ध-धम्माच्या नागरिकांनी या मेळाव्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रमोद सोमकुंवर करीत आहेत..

संपर्क: प्रमोद सोमकुंवर
9373617114

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here