prabodhini news logo
Home अहेरी गावस्तरावरील शासकीय पद भरती नियमानुसार घ्या.

गावस्तरावरील शासकीय पद भरती नियमानुसार घ्या.

0
116

माजी पंचायत समितीचे सदस्य हर्षवर्धन बाबा आत्राम यांनी तहसीलदार अहेरी यांच्याशी केली चर्चा..

अहेरी प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज नेटवर्क – अहेरी तालुक्यामध्ये गाव स्तरावरील विविध प्रकारचे शासकीय नोकर भरती होत आहे. परंतु सदर भरती मध्ये सबंधित विभागाकडून नियम बाह्य पद्धतीने भरती होत असल्याची तक्रार नागरिकांकडून असल्यामुळे माजी पंचायत समितीचे सदस्य – हर्षवर्धन बाबा आत्राम यांनी तहसीलदार कार्यालय अहेरी येथे भेट घेऊन, अहेरीचे तहसीलदार बालाजी सोमवंशी यांच्याशी तक्रार होत असलेले नौकर भरती प्रकिय बदल चर्चा केले.
सदर चर्चा मध्ये माजी पंचायत समितीचे सदस्य – हर्षवर्धन बाबा आत्राम यांनी म्हणाले की, अहेरी तालुका मध्ये बाल विकास प्रकल्प अहेरी कडून होणारी पद भरती प्रकिया हे त्यांचा शासकीय जाहिराती चा नियमांचा विरोधात भरती होत असल्याची तक्रार काही गावकऱ्यांनी केले आहेत.
सदर तक्रार मध्ये गावकऱ्यांचे म्हणणे आहे की, बाल विकास प्रकल्प अहेरी कडून होणारी भरती मध्ये – मदतनीस पदासाठी ज्या गावासाठी पद भरती होत आहे. त्याच महसुली गावाचा उमेदवार हे स्थायी रहिवासी असणे आवश्यक आहे. परंतु अहेरी तालुक्यातील काही गावांमधे दुसऱ्या गावातील महिलांनी सुद्धा खोटी कागदपत्रे जोडुन, आम्ही सुद्धा त्याचा गावाचा रहिवासी असल्याचे चुकीचे माहिती अर्ज मध्ये भरून अर्ज सदर केलेले आहे. आणि बाल विकास प्रकल्प कार्यालय अहेरी कडून त्याची चौकशी ना करता दुसऱ्या गावातील महिलांना मदतनीस म्हणुन नियुक्तीचा आदेश दिले आहेत. या बाबतची माहिती गावकऱ्यांना मिळताच त्याचा तक्रार गावकऱ्यांनी बाल विकास प्रकल्प अहेरी येथे केले परंतु सबंधित विभागणी डोळे जाक करून दुसऱ्याच गावातील उमेदवाराला मदतनिस म्हणुन नियुक्ती केले आहे असे गावकऱ्यांचे म्हणणे आहे.
म्हणुन तहसील कार्यालय अहेरी कडून अहेरी तालुक्यातील सर्व महसुली गावांचे यादी मध्ये त्या महसुली गावामध्ये किती वाड्या/ टोले आहेत याची सुद्धा स्पष्ट उल्लेख करून बाल विकास प्रकल्प अहेरी यांच्याकडे महसुली गावांचे यादी द्यावे .
जेणेकरून ज्या गावासाठी पद भरती आहे त्याच गावातील उमेदवाराची निवड पद भरती मध्ये झाला पाहिजे असे हर्षवर्धन बाबा आत्राम यांनी तहसीलदार यांना म्हणाले.
यावेळी उपस्थित – राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा सचिव – बालाजी गावडे, राष्ट्रवादीचे अहेरीचे तालुकाध्यक्ष – नागेश मडावी, अहेरी नगरपंचायतचे उपाध्यक्ष – शैलेश पटवर्धन, प्रा. रतन दुर्गे, बाबुराव तोरेम, सुरत जाधव, मंगु पोदाडी, देवाजी पोदाडी, तिरुपती मडावी, योगेश पाटील, आकाश राऊत सह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here