prabodhini news logo
Home चंद्रपूर राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे प्रदेश सचिव आरिकर व ग्राहक संरक्षण सेलचे जिल्हा...

राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे प्रदेश सचिव आरिकर व ग्राहक संरक्षण सेलचे जिल्हा अध्यक्ष देव कन्नाके ह्यांचा राष्ट्रवादी काँगेस मध्ये प्रवेश

0
61

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे चंद्रपूर मधील पक्ष संघटन बघता राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये अनेक संघटना व पक्षाचे पदाधिकारी राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश करण्यास इच्छुक आहे.
आज दिनांक 17/8/25 ला राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे प्रदेश सचिन तथा आदिवासी सेवक व दलित मित्र जेष्ठ पत्रकार आरिकर साहेब तसेच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे ग्राहक संरक्षण सेल जिल्हाध्यक्ष डॉ देव कन्नाके ह्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस चे राष्ट्रीय कार्याध्यक्ष खा. प्रफुल पटेल ह्यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये प्रवेश घेण्यात आला. प्रवेश घेते वेळी चंद्रपूर जिल्ह्याचे निरीक्षक राजेंद्रजी जैन साहेब, चंद्रपूर शहर जिल्हाध्यक्ष राजीव कक्कड, विधानसभा अध्यक्ष सुनील काळे, व युवक अध्यक्ष अभिनव देशपांडे ह्यांची प्रमुख उपस्थिती होती.
प्रवेश केल्या नंतर आरिकर साहेब आणि देव कन्नाके ह्यांना पक्ष वाढी साठी शुभेच्छा देण्यात आल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here