
द मराठा चॅरीटेबल ट्रस्ट आणि बाळूभाऊ मित्र परिवार यांच्या वतीने आयोजित “भाऊंची दहीहंडी २०२५” उत्सव अत्यंत भव्य आणि उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. या सोहळ्याचे विशेष आकर्षण ठरले ते लहान मुलांसाठी घेण्यात आलेली भव्य वेशभूषा स्पर्धा.
पारंपरिक ते आधुनिक अशा विविध आकर्षक पोशाखांमध्ये सजून लहानग्यांनी रंगतदार सादरीकरण करून उपस्थितांची मने जिंकली. त्यांच्या निरागस हास्याने आणि जोशपूर्ण सहभागाने संपूर्ण वातावरण भारावून गेले.
या स्पर्धेत स्पृहा वाटेकर हिने प्रथम पारितोषिक, सान्वी लालसरे हिने द्वितीय पारितोषिक, तर सानिधी इटनकर हिने तृतीय पारितोषिक पटकावले. याशिवाय इतर सर्व स्पर्धकांचा उत्साह आणि परिश्रम यांचा गौरव करण्यासाठी १० मुलांना प्रोत्साहनपर पारितोषिके प्रदान करण्यात आली.















