
नागपूर प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज – दि. २१ ऑगस्ट गुरुवारी विदर्भीय दौऱ्याच्या दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष व महाराष्ट्र राज्याचे उप मुख्यमंत्री नामदार अजित पवार यांच्या नागपूर भेटी दरम्यान राहुल कॉम्प्लेक्स गणेशपेठ, नागपूर येथील पक्ष कार्यालयात नागपूर शहर व ग्रामीण पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.
या बैठकीची नियोजनात्मक तयारी व यशस्वितेसाठी आज पक्ष कार्यालय, नागपूर येथे विशेष बैठक नागपूरचे निरीक्षक व माजी आमदार राजेंद्र जैन यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. आजच्या बैठकीत आगामी २१ ऑगस्ट ला होणाऱ्या बैठकीच्या यशस्वितेसाठी सविस्तर नियोजन करण्यात आले.
बैठकी दरम्यान गोंदिया जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल राजेंद्र जैन व भंडारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक च्या संचालक पदी प्रशांत पवार यांची निवड झाल्याबद्दल शाल व श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी सर्वश्री माजी आमदार राजेंद्र जैन, देवेंद्रनाथ चौबे, नागपूर शहराध्यक्ष प्रशांत पवार, कार्याध्यक्ष श्रीकांत शिवणकर महिलाआयोग सदस्य आभा ताई पांडे, पंचायत समिती समिती सदस्य नरेश भाऊ आरसडे विदर्भ अध्यक्ष राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस माधुरी वैभव पालीवाल सुनीता येरणे, संदीप सावरकर, अमरीश ढोरे, समीर रहाटे, आशिष मदान, अनिल अहिरकर, राजेश माटे, सुखदेव वंजारी, लक्ष्मी सावरकर, रमन ठवकर, बिरू सिंग तोमर, सचिन चव्हाण, पांडुरंग गायकी, ब्रह्मानंद मस्के, हाजी सोहेल पटेल, विशाल खांडेकर, तानाजी वनवे, आभा पांडे, लक्ष्मीकांत पांडे, राजू मिश्रा, निलिकेश कोल्हे, मिलिंद महादेवकर, अनिता वर्मा, झाकीर अली, जावेद हबीब, समी सिद्दिकी, सलाम शेख, यशश्री बनसोड, नरेश अरसडे, कनिजा बेगम, भारती गायधने, पुष्कर सिंग, बजरंग परिहार, जानबा मस्के, सचिन रंगारी, मुमताज बेगम, मिलिंद जगताप, राजाभाऊ टाकसाळे, नूतन रेवतकर, मॉन्टी गंडेचा, रमेश फुले, मनोज जरेल, रितेश फुलबांदे, आकाश चिमणकर, बालबुधे गुरुजी सहित पक्ष पदाधिकारी व कार्यकर्ता उपस्थित होते.















