
रविंद्र मैंद ब्रम्हपुरी तालुका प्रतिनिधी प्रबोधिनी न्यूज
ब्रह्मपुरी : तालुका काँग्रेस कार्यालय, ब्रह्मपुरी येथे भारताचे माजी पंतप्रधान आणि जनतेच्या मनावर अमीट ठसा उमटवणारे दिवंगत राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला. या प्रसंगी तालुक्यातील अनेक मान्यवर, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमात उपस्थितांनी राजीव गांधी यांच्या स्मृतीला अभिवादन करून त्यांच्या कार्याचा गौरव केला. भारताच्या आधुनिकतेचा पाया घालणारे, कॉम्प्युटर तंत्रज्ञान भारतात आणणारे, पंचायतराज व्यवस्थेला नवी दिशा देणारे आणि युवकांसाठी नवी दारे खुली करणारे राजीव गांधी यांनी देशाला दिलेल्या योगदानाची आठवण यावेळी करून देण्यात आली. गोसेखुर्द धरणासारख्या महत्त्वाच्या योजनांना गती देऊन त्यांनी शेतकऱ्यांचे आयुष्य सुजलाम-सुफलाम केले. तसेच, भारतातील युवकांना जागतिक तंत्रज्ञानाशी जोडून घेण्याचे दृष्टीकोनात्मक कार्य केल्यामुळे त्यांना “भारताच्या कॉम्प्युटर क्रांतीचे शिल्पकार” म्हणून ओळखले जाते.
या जयंती सोहळ्यात तालुका काँग्रेसचे तालुका अध्यक्ष खेमराज तिडके, शहर काँग्रेस अध्यक्ष हितेंद्र राऊत, डॉ. राजेश कांबळे, प्रमोद चिमूरकर, आसाराम बोधले, अमित कन्नाके, मनोज (मुन्ना) रामटेके, भूपेंद्र बेदरे, सुधाकर पोपटे, राकेश पडोळे, लक्ष्मण जीपकाटे, संदीप बगमारे, वासुदेव सोंदरकर, रवी मैंद, सुभाष उपासे, दीपक खंडाईत, जगदीश आमले, पुष्पाकर बांगरे, नेताजी पिसे, भास्कर सोनवणे, अतुल राऊत, अमोल सुकारे, सुरेश ठेंगरी, ज्ञानेश्वर मेश्राम, राममोहन ब्राडिया, पराग बनपुरीकर, सागर आमले, विनायक पठाण, सोमेश्वर उपासे, सागर मेश्राम, सुरेश वंजारी, प्रभाकर नाकतोडे, राहुल भोयर, गोपी चिंचोलकर इत्यादी पदाधिकारी, कार्यकर्ते व मान्यवर मोठ्या संख्येने सहभागी झाले.















