prabodhini news logo
Home चंद्रपूर श्रावण महिन्यात दररोज सामुदायिक प्रार्थना व भजन उपक्रमास उत्तम प्रतिसाद

श्रावण महिन्यात दररोज सामुदायिक प्रार्थना व भजन उपक्रमास उत्तम प्रतिसाद

0
104

श्री. गुरुदेव सेवा मंडळ ऊर्जा नगरचा स्तुत्य उपक्रम

प्रणाली येरपुडे विशेष तालुका प्रतिनिधी चंद्रपूर – ऊर्जानगर (चंद्रपूर)- श्री. गुरूदेव सेवा मंडळाच्या वतीने प्रथमच यावर्षी श्रावण महीण्याच्या शुभ पर्वावर मंडळाच्या सर्व सभासदांच्या घरी सायंकाळी सामुदायिक प्रार्थना व भजन सेवा घेण्याचा उपक्रम घेण्यात आला.
ही सामुदायिक प्रार्थना दररोज सायंकाळी ७ वाजता घेण्यात आली नंतर भजनाचा कार्यक्रम घेण्यात येत होता.
प्रार्थना मानव्य शिक्षणची शाळा, ग्रामसंस्कृतीचा मुख्य जिवाळा । भेद कल्पना जाती रसातळा, प्रार्थनेच्या मुशीमाजी। राष्ट्रसंत श्री. तुकडोजी महाराजांचा हा विचार समोर ठेवून सामुदायिक प्रार्थनाचे प्रायोजन करण्यात आले होते.
श्रावणमास प्रित्यर्थ सामुदायिक प्रार्थना व भजन उपक्रमाला ऊर्जानगर वसाहतीतील सर्वश्री विनोद ऊईके, रामदास तुमसरे, शंकर दरेकर, देवराव कोंडेकर, बंडू कुळमेथे ,विठ्ठल नन्नावरे, प्रशांत दुर्गे ,राजेश काळमेघ, बालकुमार सोमलकर, बबनराव दडमल, मुरलीधर कौरासे, अशोकराव धमाने ,किसनजी कुडे, नानाजी बावणे, हरिश्चंद्र देवतळे, सुयोग वऱ्हाटे, अशोक खाडे, गंगाधर बावणे, गणेश लक्ष्मण लहाने, मनिषा बोथले, राजेंद्र पोईनकर, दिलीप भाऊराव डुडुरे यांनी आपल्या घरी दररोज सामुदायिक प्रार्थना व भजन सेवा घेण्याची संधी श्रीगुरुदेव सेवा मंडळाला दिली त्याबद्दल समारोपीय कार्यक्रमात सर्व सभासदांच्या आभार मानून धन्यवाद देण्यात आले व दरवर्षी अशा उपक्रमात सहभागी व्हावे असे सांगण्यात आले या समारोपीय कार्यक्रमाला मंडळाच्या जेष्ठ पदाधिकारी सेवक सेविकांची उपस्थिती होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here