
प्रशांतजी नी साहित्य अंगणी
लावले ‘प्रबोधिनी मंच’ चे रोप
डोळसपणे निगराणी करता
जोमात वाढले,डौलात वाढले खूप.(१)
रोपाचा झाला वृक्ष सुन्दर
काव्य,लेख,बातमी, जाहिरात
बहरल्या फांद्या मन मोहक
विविधांगी लेखनाची सुयशी सुरुवात.(२)
सारस्वतांची लेखणी पोहचली घर घरात
सामाजिक,राजकीय क्षेत्रात
रोवले मानाचे तुरे अनेक
वंचित समाजास लाभलं
मदतीचा हात.(३)
सामाजिक बांधिलकीची नाती
सर्वांची सर्वांगीण उन्नती
लिहित्या लेखणीला गती
ही झेप आचंबित होती.(४)
प्रगती यशाच्या वर्धापनदिनी
मनापासून देते शुभ कामना
आकाशी घालावी गवसणी
दिगंतर किर्ती ही अंतरी भावना.(५)
अंजली गरगटे.(पुणे)














