
रविंद्र मैंद ब्रम्हपुरी तालुका प्रतिनिधी प्रबोधिनी न्यूज – आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूकीच्या अनुषंगाने ब्रम्हपूरी तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने ब्रम्हपुरी तालुक्यातील चौगान-खेडमक्ता जि.प. गण व पं.स. गणामधील काॅंग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांची संघटनात्मक बैठक आज दि. २९ आॅगस्ट २०२५ रोजी, शहरातील विठ्ठल रुक्मिणी सभागृहात पार पडली.
यावेळी बैठकीला तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खेमराज तिडके, बाजार समितीचे सभापती प्रभाकर सेलोकर, माजी जिल्हा परिषद सदस्य डॉ राजेश कांबळे, माजी जिल्हा परिषद सदस्य प्रमोद चिमुरकर, युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सोनू नाकतोडे, माजी पंचायत समिती सभापती नेताजी मेश्राम, जिल्हा काॅंग्रेस सचिव वासुभाऊ सोंदरकर, तालुका काँग्रेस उपाध्यक्ष वामन मिसार, तालुका काँग्रेस सहसचिव अमित कन्नाके, अल्पसंख्याक सेलचे तालुकाध्यक्ष मोहसीन कुरेशी, अनुसूचित जाती सेलचे जिल्हा महासचिव प्रा.डि.के.मेश्राम, बाजार समितीचे संचालक दिवाकर मातेरे यांसह अन्य काॅंग्रेस पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.
यावेळी बोलतांना तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खेमराज तिडके म्हणाले की, पुढील काही महीन्यात जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुका पार पडणार आहेत. या निवडणुकांमध्ये काँग्रेसचा विजयी झेंडा फडकवण्यासाठी आपण सर्वांनी एकत्रित येऊन विजयी निर्धार करावा असे आवाहन देखील त्यांनी यावेळी केले. यावेळी उपस्थित अन्य मान्यवरांनी देखील पक्ष विस्तार व कार्यपद्धतीच्या अनुषंगाने मार्गदर्शन केले.
सोबतच यावेळी पक्षाला बळकट करून पक्ष विस्तार करण्याच्या अनुषंगाने चर्चा करण्यात आली. सदर बैठकीला मोठ्या संख्येने काॅंग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.















