
रविंद्र मैंद ब्रम्हपुरी तालुका प्रतिनिधी प्रबोधिनी न्यूज – ज्ञानदीप प्रशासकीय महाविद्यालय चौगान ता. ब्रम्हपुरी जिल्हा चंद्रपूर येथील विद्यार्थ्यांना शैक्षणिक गुणांनुक्रम, क्रीडा स्पर्धा, पदवी वितरण, नवप्रवेशित विद्यार्थ्यांचे स्वागत व वार्षिक बक्षीस वितरण सोहळा पार पडला. कार्यक्रमाची सुरुवात सर्व पाहुण्यांच्या उपस्थितीमध्ये वृक्षारोपण करून करण्यात आली, कार्यक्रमाला विशेष उपस्थिती मा. पोलीस उपनिरीक्षक (PSI) गौतम पोलीस स्टेशन ब्रह्मपुरी, पोलीस कॉन्स्टेबल सावसाकडे, गावचे सरपंच उमेश धोटे, उपसरपंच अंकुशजी मातेरे, ऍडव्होकेट आशिषजी गोंडाने, संस्थेचे अध्यक्ष रुपेश निहाटे, मा. हाश्मी, मा. डॉ. तागडे, मा. मेश्राम कृ. जु. कॉलेज चौगान, मा. करकाडे तलाठी चौगान, मा. धोंगडे जि.प. शाळा चौगान, प्राध्यापक पिलारे, महाविद्यालयाच्या प्र. प्राचार्य प्रधान मॅडम गणपतची तिडके, कापगते मॅडम, उपस्थित नियमित विद्यार्थी, माजी विद्यार्थी आणि बहुसंख पालकांच्या उपस्तिथीत बहुमान सोहळा संपन्न झाला.
सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत संस्थेचे अध्यक्ष संस्थापक मा. रुपेशजी निहाटे सर यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला.
सर्व मान्यवर व प्रमुख पाहुण्यांनी विद्यार्थ्यांना संबोधित केले की यश मिळवण्यासाठी शिस्त, परिश्रम, आत्मविश्वास, जिद्द, चिकाटीच्या बळावर कोणतेही शिखर गाठता येते.
प्रथम वर्षातून गुणांनुक्रम किरण खरकाटे, ख़ुशी सहारे, रशमी खरकाटे, द्वितीय वर्षातून वैष्णवी ठाकरे, भाग्यवान राऊत, अखिल वालदे, प्रीती पिलारे, वैष्णवी मुरे, तृतीय वर्षातून अनामिका ठाकरे, पूनम बावणे, ज्ञानेश्वरी बनपूरकर, आणि स्टुडंट्स ऑफ द इयर विष्णू शंकर देव्हारी यांना देण्यात आला.
विद्यार्थ्यांच्या कलागुणांना व शैक्षणिक गुणांनुक्रम विद्यार्थ्यांचा बक्षीस वितरण सोहळा यशस्वी पार पडण्याकरीता महाविद्यालयाचे तसेच ज्ञानदीप कॉन्व्हेंट चौगान संपूर्ण प्राध्यापक व इतर कर्मचारी यांनी विशेष सहकार्य केले आणि कार्यक्रमाचे सांगता सर्वांनी स्नेहभोजन करून केले.















