
तिरुमलेश कंबलवार गडचिरोली प्रतिनिधी – गडचिरोली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मा. सुहास गाडे सर यांच्या नेतृत्वाखाली आज एट्टापली तालुक्यातील महादेव महिला प्रभाग संघ गट्टा उडेरा अंतर्गत गावांना भेट देण्यात आली. या दौऱ्यात जिल्हा अभियान व्यवस्थापक ‘उमेद’ मा. भोपये सर, जिल्हा व्यवस्थापक मा. आत्राम सर, तालुका अभियान व्यवस्थापक एट्टापली मा. बरडे सर तसेच तालुका व्यवस्थापक मा. शेख सर उपस्थित होते.
तुमरगुंडा, परसलगोंदी, हेडरी, जांभीया व गट्टा या गावातील महिला बचतगटांच्या सदस्यांशी संवाद साधून त्यांना नवीन उद्योग उभारणीबाबत मार्गदर्शन करण्यात आले. महिलांकडून गटामार्फत सुरू असलेल्या विविध उपक्रमांची माहिती घेण्यात आली. तसेच उपजीविका उपक्रमांच्या विस्तारासाठी सविस्तर चर्चा झाली.
यावेळी अधिकाऱ्यांनी महिलांना पारंपरिक उपजीविकेसोबतच नव्या उद्योगांना चालना देण्याचे आवाहन केले. महिलांनीही नव्या संधींचा लाभ घेऊन आर्थिक सक्षमीकरण साध्य करण्याची तयारी दर्शविली.















