prabodhini news logo
Home चंद्रपूर एस. आर. एम. समाजकार्य महाविद्यालयात “संशोधन पद्धती” विषयावर एक दिवसीय विद्यापीठ स्तरीय...

एस. आर. एम. समाजकार्य महाविद्यालयात “संशोधन पद्धती” विषयावर एक दिवसीय विद्यापीठ स्तरीय कार्यशाळा संपन्न

0
80

प्रशांत रामटेके संपादक प्रबोधिनी न्युज – चंद्रपूर, दि.30ऑगस्ट 2025 . दि. 30 ऑगस्ट ला एस. आर. एम. महाविद्यालय, पडोली,चंद्रपूर येथे “संशोधन पद्धती “या विषयावर एकदिवसीय विद्यापीठ स्तरीय कार्यशाळा” महाविद्यालयाच्या ‘अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष’ (IQAC) आणी ‘सेंटर फॉर हायर लर्निंग अ‍ॅण्ड रिसर्च’ (CHLR) च्या वतीने संपन्न झाली.
या कार्यशाळेचे उद्घाटन ‘मातृसेवा सेवा संघ इन्स्टिट्यूट ऑफ सोशल वर्क, नागपूर’ येथील प्रोफेसर डॉ.केशव वाळके यांच्या शुभ हस्ते करण्यात आले. महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्य डॉ. ममता ठाकूरवार ह्यांनी उद्घाटन समारोहाचे अध्यक्षस्थान भूषविले.
याप्रसंगी महाविद्यालयाच्या जेष्ठ प्राध्यापिका व माजी प्रभारी प्राचार्य डॉ. यश्री कापसे, गोंडवाना विद्यापीठाचे माजी अधिष्ठाता डॉ. संजीव निंबाळकर, आय.क्यू.ए.सी.चे समन्वयक प्रा.नितीन रामटेके, सी.एच.एल.आर.चे समन्वयक डॉ. देवेंद्र बोरकुटे, नॅक समन्वयक डॉ.सिद्धार्थ वाकुडे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. उद्घाटन समारोहाचे संचालन आय.क्यू.ए.सी.चे सह- समन्वयक डॉ.निलेश ढेकरे यांनी केले तर उपस्थितांचे आभार नॅक समन्वयक डॉ.सिद्धार्थ वाकुडे यांनी मानले.
दोन सत्रामध्ये संपन्न झालेल्या या कार्यशाळेच्या प्रथम सत्रात साधन व्यक्ती म्हणून लाभलेले प्रोफेसर डॉ. केशव वाळके यांनी कार्यशाळेत सहभागी असणाऱ्या रिसर्च स्काॅलरना संशोधनाच्या विषय निवडीपासून ते संशोधनाची रुपरेषा कशी तयार करावी याबाबत मार्गदर्शन केले. सत्राचे अध्यक्षस्थान डॉ. जयश्री कापसे यांनी भूषविले होते. साधन व्यक्तीचा परिचय व सत्राचे संचालन डॉ.देवेंद्र बोरकुटे यांनी केले तर आभार महाविद्यालयाच्या सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ. कल्पना कवाडे यांनी मानले.
कार्यशाळेच्या द्वितीय सत्रासाठी लाभलेले साधन व्यक्ती जनता शिक्षण महाविद्यालय, चंद्रपूर चे प्रभारी प्राचार्य प्रोफेसर डॉ.गणेश पेटकर यांनी संशोधकाने तथ्य संकलना पासून ते अहवाल लिखाण कसे करावे याबद्दलच सविस्तर मार्गदर्शन सहभागी रिसर्च स्कॉलर्सना केले. सत्राच्या अध्यक्षस्थानी डॉ.संजीव निंबाळकर हे होते. साधन व्यक्तीचा परिचय व या सत्राचे संचालन आय.क्यू.ए.सी.चे सदस्य डॉ.सुभाष गिरडे यांनी केले तसेच उपस्थितांचे आभार राष्ट्रीय सेवा योजनेचे सह-समन्वयक प्रा.संतोष आडे यांनी मानले.
या कार्यशाळेचा समारोप महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्या डॉ. ममता ठाकूरवार ह्यांच्या अध्यक्षतेखाली व प्रोफेसर डॉ. गणेश पेटकर, डॉ. जयश्री कापसे, डॉ. संजीव निंबाळकर, डॉ. देवेंद्र बोरकुटे, डॉ. निलेश ढेकरे, डॉ.सिद्धार्थ वाकुडे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.
याप्रसंगी रिसर्च स्कॉलर्संना “सहभागीत्व प्रमाणपत्र” उपस्थितांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. या समारोपीय कार्यक्रमाचे संचालन तसेच कार्यशाळेला लाभलेले साधन व्यक्ती, कार्यशाळेत सहभागी सर्व उपस्थित, कार्यशाळेच्या यशस्वितेत सहभागी असणाऱ्या महाविद्यालयातील प्राध्यापकवृंद व शिक्षकेत्तर कर्मचारीवृंद ईत्यादिंचे आभार प्रा.नितीन रामटेके यांनी व्यक्त करून कार्यशाळेची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली. हि कार्यशाळा महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्या डॉ. ममता ठाकूरवार यांच्या नियंत्रणात घेण्यात आली तसेच कार्यशाळेच्या यशस्वीतेत महाविद्यालयातील प्राध्यापक वृंद डॉ. जयश्री कापसे , डॉ. संजीव निंबाळकर,डॉ. कल्पना कवाडे , प्रोफेसर डॉ. प्रगती नरखेडकर, प्रा.विश्वनाथ राठोड, प्रा. संतोष आडे, डॉ.किरणकुमार मनूरे, डॉ. सुभाष गिरडे यांचा आणी शिक्षकेत्तर कर्मचारी वृंद अधिक्षक हिरा वाघमारे, सहाय्यक ग्रंथपाल बाळकृष्ण लांबट व रामेश्वर शेगोकर, लेखापाल कृष्णप्रकाश कुराला, लिपिक वंदना सिडाम व सुखदेव चौधरी, ग्रंथालय सहाय्यक अमित अमृतकर, योगेश भगत, ज्योती येलेट्टीवार तसेच चतुर्थ श्रेणी कर्मचारी गीता तेलंग, खीमदेव हिंगाने, रमेश ठाकरे, घनश्याम बोरकर, ओमप्रकाश साठवणे, रितेश खोटे, राष्ट्रपाल तेलतुबडे, सोनाली सूर यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
या कार्यशाळेत गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील पि.एच.डी.पदवी नोंदणीकृत रिसर्च स्कॉलर्स,W चंद्रपूरातील विविध महाविद्यालयातील प्राध्यापकवृंद तसेच एम.एस.डब्लू.- चतुर्थ सत्राचे विद्यार्थी सहभागी झाले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here