prabodhini news logo
Home ठळक बातम्या रायगडनगर येथे मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान.

रायगडनगर येथे मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान.

0
116

नाशिक तालुक्यातील रायगडनगर येथे मुख्यमंत्री समृद्ध पंचायत अभियान अंतर्गत भव्य प्रभात फेरी काढण्यात आली. त्यावेळी गावातील जिल्हा परिषद शाळेतील सर्व विद्यार्थी मुख्याध्यापक उपशिक्षक गावातील सर्व बचत गट ग्रामपंचायत कर्मचारी सदस्य उपस्थित होते. ग्रामपंचायत सरपंच काळूबाई शिद तसेच ग्रामपंचायत अधिकारी गणेश पगारे यांनी ग्रामस्थांस अभियानाची माहिती दिली. अभियानाअंतर्गत गावात सुशासन प्रस्थापित करणे आत्मनिर्भरता निर्माण करणे. गाव विकासासाठी सर्व समावेशक स्पर्धात्मक वातावरण तयार करून पारदर्शक प्रशासन आरोग्य शिक्षणं महिला सक्षमीकरण रोजगार पर्यावरण करवसुली या विषयावर चर्चा करण्यात आली.
त्यावेळी संजय लचके, कैलास गोहिरे, विलास जाधव, राजू मेंगाळ, सुभाष शिड, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते रामनाथ गोहिरे यांचे सहकार्य लाभले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here