prabodhini news logo
Home कविता प्रबोधिनी मंच महाराष्ट्र साहित्य समुह तर्फे विशेष कविता – “निसर्ग माझा गुरु”

प्रबोधिनी मंच महाराष्ट्र साहित्य समुह तर्फे विशेष कविता – “निसर्ग माझा गुरु”

0
162

नैराश्य उदासी घालविण्यासाठी |
येऊन बसलो निवांत समुद्र काठी ||
लाटांवर लाटा येती अन् जाती |
सुखदुःख हातात हात घालून येती ||१||

सगळेच सामावून आपल्या कवेत |
सागर राही नेहमीच नामानिराळा ||
जगावे असेच देतो मानवा संदेश |
असेल सुखी जीवनाचा निर्वाळा ||२||

मनाचा उन्माद करी जन्माचा नाश |
समुद्र प्रलय करी मानवाचा विनाश ||
असता चित्त अन् सागर स्वस्थ शांत |
समाधान, आनंदे व्यापेल अवकाश ||३||

धरती, आकाश, सागर सगळे |
देती अवघ्या जगाला संदेश ||
जर करशील मानवा उतमात |
अटळ आहे तुझा विनाश ||४||

ध्येय असावे तुझे पर्यावरण रक्षण |
करेल मदत करण्या निसर्ग राखण ||
जगबुडी रोखण्याचा हाच एक क्षण |
अस्वच्छता निर्मूलन घेऊ एकच आण ||५||

(स्वरचित)
नीला चित्रे, चिंचवड पुणे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here