
काय सांगू कविता माझी
कशी शब्दातून बोलते
अस्वस्थ मनातल्या भावना
हळुवार शब्दात मांडते
जे दिसते आजूबाजूला
सुख दुःख मनास भिडते
जसा येईल आकार
तसे कागदावर उतरते
कविता माझी आहे सखी
छत्र तिच्या कृपेचे असते
तिच आहे माझी सावली
तिच माय माऊली वाटते
मनात साचलेले सारे
मोकळे होऊन जाते
मी काही बोलत नाही
कविताच सारे सांगते
काय सांगू कविते तुला
तुझ्यामुळे जगणे सोपे झाले
दान तुझे पडले आणिक
रंग आयुष्याला आले..
गुलाब अनिल वेर्णेकर.. गोवा















