
तूच आहेस आदीशक्ती
नवऱ्यावर अपार भक्ती
स्वत्वाशी कायमच लढाई
अत्याचार सोसे ठाई ठाई
स्वाभिमानाची करावी राखण
ह्यातच दिसते तुझे ठामपण
घे भरारी नष्ट होईल तुझे खुजेपण
सन्मानाने मिळव यश कष्ट सोसून
स्वत्वाशी करुनी लढाई
स्वाभिमानाची कर राखण
सकलांची कर प्रेमभरे भक्ती
तुझ्यातच सहनशक्तीचे आंदण
आत्मसन्मान जपणे अट्टाहास
हाच असे तुझा जीवनप्रवास
बाईपण भारी देवा
तिच्या पोटी जन्म घ्यावा
ती आहे म्हणून नर
सहजी जन्माला यावा
स्त्री शक्तीचा करा उदो उदो
आदिशक्तीचा असे बोलबाला
स्त्रीत्व हाच उगम न् हाच अंत
नारीशक्तीचा जयघोष बोला
(स्वरचित)
नीला चित्रे
चिंचवड पुणे















