prabodhini news logo
Home कविता प्रबोधिनी मंच महाराष्ट्र समुह तर्फे विशेष कविता – नारी शक्ती 

प्रबोधिनी मंच महाराष्ट्र समुह तर्फे विशेष कविता – नारी शक्ती 

0
89

नाही अबला राहिले
फक्त मलाच वाटते
साज श्रृंगार करुनी
सण उत्सवी नटते

व्रत वैकल्यांना मिळे
अग्र भागी मान मला
संस्कारांचे बाळकडू
संस्कृतीचा ध्यास तुला

माथ्यावरी गुलामीची
लटकती सुरी आहे
सावित्रीच्या लेकी आम्ही
मुक्ततेची वाट पाहे

आता गिरवा वेगाने
नारीशक्ती सामर्थ्याचे
व्यासपीठी बोल खडे
चर्चासत्री स्त्रीमुक्तिचे

आम्ही बेभान होवूनी
कधी लढलो हक्काने
पारतंत्र्य झुगारुनी
नाही तोडले त्वेषाने

मनातल्या दडलेल्या
कट्यारीला धार नाही
मुक्त होऊनी अमुच्या
वेदनेची सल राही

सौ वंदना शशिकांत पाटील

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here