prabodhini news logo
Home कल्याण प्रबोधिनी मंच महाराष्ट्र समुह तर्फे विशेष कविता – नारी शक्ती

प्रबोधिनी मंच महाराष्ट्र समुह तर्फे विशेष कविता – नारी शक्ती

0
90

नारी शक्ती संदर्भात
राजकीय सांस्कृतिक l
अनेक अर्थाने जसे
वैयक्तिक सामाजिक l

जीवनाच्या पैलूमध्ये
बौद्धिकता भावनिक l
नारीच्या अंतर्निहित
आध्यात्मिक शारीरिक l

बौद्धिक शक्ती शिक्षण
संगणक तंत्रज्ञान l
नेतृत्व अंतराळात
प्रगती क्षेत्र विज्ञान l

लवचिकता संयम
सहानुभूती नारीची l
कठिण परिस्थितीत
तयारी संगोपनाची l

समाजात सक्रियता
समुदाय उभारणी l
घेती धाडसी निर्णय
पुढाकार महाराणी l

रूढी संस्कृती परंपरा
ज्ञान बऱ्याच भाषेचे l
संतुलनाचे प्रतीक
समाजात सन्मानाचे l

लोकांचे प्रतिनिधित्व
समान हक्क आदर l
न्याय आणि निष्पक्षता
नारी शक्ती पुरस्कार l

प्रा. डॉ. हंसराज रंगारी
कल्याण

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here