
आधुनिक युगाची आहे
मी नव विचारांची नारी
विज्ञानाची धरुनी कास
निसर्ग वर्धन, जपणूक करी ||१||
वट सावित्री पौर्णिमेला
चित्र वड मी पूजिते
मनोभावे पुजन करून
पतीसाठी वरदान मी मागते ||२||
शितल दाट छाया,शुद्ध हवा
देतो पक्ष्यांना निवारा
अनेक युग चालत आहे
निसर्ग सजीवांचा आसरा ||३||
पतीच्या खांद्याला खांदा लावून
उभी आहे मी संसार प्रांगणी
दोन गोड लेकरांची सर्वांगानी
डोळसपणे करिते निगराणी ||४||
सुशिक्षित स्वावलंबी जगताना
वडीलधाऱ्यांशी साधते संवाद
आनंदी घर, स्वप्न, नातीगोती जपता
लुटते कर्तव्याचा आनंद ||५||
वडपूजा एक दिवसाची
तपस्या माझी अनेक क्षणांची
परिस्तिथीवर मात करीत
कास धरीते समाजसेवेसची ||६||
अशी ही मी सावित्री
सात जन्मी माझ्या सत्यवानाची
उपक्रमामुळे संधी मिळाली
माझे नवविचार मांडण्याची ||७||
स्वरचित
सौ. अंजली गरगटे
पुणे















