
सप्तरूपाच चांदणं
जसं उगतं चंदन
माया केली सर्वावर
केलं सत्याचं जतन
धन सप्पतीचा साठा
जन हिता सांभाळले
विहीरी त्या जागोजागी
पाणवटे बांधीयले
समाजाच्या हितासाठी
लढल्या आयुष्यभर
जिवणाच्या संघर्षात
नाते जपले निर्मळ
पावित्र्याचे मनी गुण
निरपेक्षता स्वातंत्र्य
ओळख दिली समाजा
जपून नैतिक मंत्र
मंदिर मशिद दर्गे
महारस्ता प्रोत्साहन
जातीभेद बोकाळला
त्याचे केले निरसन
पतीच्या मृत्यू शोकाने
काळजावर तो घाव
पेशव्याची दादागिरी
मोडून लावला डाव
सुख समृद्धीचा पाया
संगे साम्राज्याचे बळ
आयुष्यभर झिजून
समाजाचं केलं भलं
जनमनात पेरली
समतेची शिकवण
धर्म जाती पलीकडे
स्विकारले ते धोरण
लोकमान्य राष्टमाता
दिन दु:खीताची आई
समानतेचा हा संदेश
जनमन देई ग्वाही
जनमन देई ग्वाही…..
नंदा भगत / कारंजा लाड
जि. वाशिम















