
उर्जा क्षेत्र संघटना संघर्ष मंचच्या वतीने प्रशासनास देण्यात आला ईशारा
प्रशांत रामटेके संपादक प्रबोधिनी न्युज – चंद्रपूर – महावितरण व्यवस्थापनाने पुर्वनियोजित पध्दतीने संघटनांबरोबर दिनांक ११ सप्टेंबर २०२५ रोजी पुर्नरचनेबाबत बैठक घेतली. परंतु बैठकी संघटनांचे म्हणणे किंवा संघटनांनी निदर्शनात आणलेल्या त्रुटी दुर करण्यासाठी अपेक्षीत असलेली चर्चा होवु दिली नाही. व्यवस्थापनाने एकतर्फी त्यांची बाजु मांडून व्यवस्थापणाच्या जवळच्या संघटनांचे म्हणणे ऐकुण घेतले परंतु उर्जा क्षेत्र संघटना संघर्ष मंच मधील १५ ही संघटनेचे म्हणणे ऐकुण घेतले नाही. तर त्यांना आपले म्हणणे लेखी द्यावे असे बोलून १ आक्टोंबर २०२५ पासून पुनर्रचनेची अंमलबजावणी होईल असे जाहिर करून बैठक आटोपती घेतली. त्यामुळे कामगार संघटनांची भूमिका पुर्णपणे ऐकूण घेतली नसल्याने कामगार वर्गात काही हित संबंधी संघटना सोडल्या तर अतिशय नैराशेची तीव्र भावना उत्पन्न झाली आहे. शिवाय ग्राहक वर्गात सुध्दा चलबिचल निर्माण झाली आहे.
या पुर्नरचनेचा परिणाम संपूर्ण वितरण व्यवस्थेवर होणार असुन कामगार वर्ग, ग्राहक वर्ग आणि विशेष बाब म्हणजे महावितरण कंपनी मोडकडीस येते की काय अशी आंतरिक खंत कामगार, अधिकारी, अभियंता, वर्गात दिसत असल्याने नमूद सर्व बाबीना आळा घालणे कामी कामगार, अधिकारी ग्राहक आणि वीज यंत्रणा सुरक्षित हातात राहावी म्हणुन शर्तीचे प्रयत्न म्हणून उर्जा क्षेत्र संघटना संघर्ष मंचच्या वतीने संविधानिक मार्गाने कृतिशील कार्यक्रमाचा आंदोलनाचा इशारा आम्ही शासन, प्रशासन यंत्रनेला देत आहोत याची अतिशय गांभीर्याने नोंद घेवुन होवु घातलेल्या निर्णयाप्रति पुणरविचार करावा. आणि संघटनांना विश्वासात घेवुन विचाराची दालणे मोकळी करावी. अन्यथा निर्माण होणा-या परिस्थितीला औद्योगिक शांतता, उपद्रव निर्माण झाल्यास त्यास शासन, प्रशासन जबाबदार असेन याची दखल घ्यावी असे आज चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्राच्या उर्जाभवन समोर झालेल्या द्वारसभेत सांगण्यात आले.
आंदोलनाची रूपरेषा खालीलप्रमाणे
१. दिनांक २९ सप्टेंबर २०२५ रोजी परिमंडळ कार्यालयांसमोर प्रचंडव्दार सभा,
२. दिनांक ०१ आक्टोंर २०२५ रोजी दंडाचे दोघ बाजुने काळया रिबीन बांधुन निषेध दिन नोंदवणे कंपनीचे व्हॉटसअप गृप सोडणे, कंपनीचे सिम जमा करणे.
३. दिनांक ०७ आक्टोंबर २०२५ रोजी मुंबई येथे आझाद मैदानावर प्रचंड निदर्शने व मंत्रालयावर मोर्चा अशी आंदोलनांची रूपरेषा ठरविण्यास आली आहे
या द्वारसभेला महाराष्ट्र राज्य विद्युत कर्मचारी अधिकारी अभियंता सेनाचे कार्याध्यक्ष राहुल बेले , महाराष्ट्र नवनिर्माण विज कामगार संघटनेचे केंद्रीय सरचिटणीस नरेंद्र रहाटे,सचिव देवेंद्र मालुसरे,बहुजन पाॅवर कर्मचारी संघटनेचे केंद्रीय समन्वयक मनोज चतुर, एम एस ई बी वर्कर्स युनियन (पॉवर फ्रंट) चे केंद्रीय सरचिटणीस प्रदीप ढाले,सचिव प्रकाश वाघमारे, असोसिएशन आफ केमिष्टचे अध्यक्ष एस डी कस्तुरे ,एसईए चे नितीन काळे यांनी द्वारसभेला संबोधित केले .यावेळी संघटनेचे पदाधिकारी मुख्य संघटक श्रीकांत राय,उपाध्यक्ष दिलीप मोहोड,अध्यक्ष भीमराव उंदिरवाडे,सचिव राजेश आत्राम,छोटू साव,दिलीप घोडमारे,राज मुजुमदार, शाखाध्यक्ष देवराव कोंडेकर,मुख्य संघटक धर्मेंद्र कन्नाके,अशोक लोहार,धनराज सपकाळे,नाना बावणे,विजय राठोड,शिवदास घुले,उज्वल सोनवणे तथा सर्व संघटनेचे पदाधिकारी व सदस्यांची उपस्थिती होती.















