
बंधु भगिनींना व लहान मुलांना केक व भोजनदान वाटप
चंद्रपूर प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज – 69 व्या धम्मचक्र अनुप्रवर्तन दिनाचे औचित्य साधून दीक्षाभूमी येथील बुद्धीस्ट फाउंडेशनच्या वतीने विद्या डोंगरे यांच्या वाढदिवसानिमित्त दीक्षाभूमी येथे येणाऱ्या बंधू -भगिनींना केक व भोजन वाटप करून वाढदिवस साजरा करण्यात आले.
या प्रसंगी बुद्धीस्ट फाउंडेशनचे सल्लागार नरेंद्र रहाटे, सी. जी रामटेके, सुभाष शेडमाके, प्रसिद्धी प्रमुख वंदना मनपे, विलास जीवने आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते तसेच सामाजिक कार्यकर्त्या अंजली मेश्राम, अल्का मोडघरे,हेमलता खोब्रागडे,पपीता तामगाडगे, समता अवतरे, स्वाती नगराळे, लक्ष्मी तावाडे, पत्रकार रामटेके आदी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवीली.















