prabodhini news logo
Home चंद्रपूर ब्रह्मपुरीत आमदार विजय वडेट्टीवार यांच्या हस्ते काँग्रेसच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन

ब्रह्मपुरीत आमदार विजय वडेट्टीवार यांच्या हस्ते काँग्रेसच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन

0
85

रविंद्र मैंद ब्रम्हपुरी तालुका प्रतिनिधी प्रबोधिनी न्यूज – ब्रह्मपुरी येत्या दोन डिसेंबरला ब्रह्मपुरी नगर परिषदेसाठी निवडणुकीची मतदान प्रक्रिया पूर्ण होणार आहे. २६ नोव्हेंबरला चिन्ह वाटप झाल्यापासून भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पार्टीच्या प्रचाराला जोरात सुरुवात झाली असून ब्रह्मपुरी शहरातील प्रियदर्शनी इंदिरा गांधी (ख्रिस्तानंद चौक) जवळ नुकतेच नव्याने काँग्रेस पक्षाचे कार्यालय उभारण्यात आले. त्या काँग्रेस प्रचार कार्यालयाचे उद्घाटन गुरुवार दिनांक २७ नोव्हेंबर २०२५ रोजी. माजी मंत्री, विरोधी पक्षनेते, तथा ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्राचे आमदार विजय वडेट्टीवार यांच्या हस्ते पार पडले.

प्रभाग क्रमांक १ ते प्रभाग क्रमांक ११ येथील प्रत्येक प्रभागात विविध नव्याने प्रचार कार्यालय उभे करण्यात आली आहेत. त्यापैकी ख्रिस्तानंद चौक येथे उभारण्यात आलेला हा प्रचार कार्यालय मुख्य असणार आहे. याप्रसंगी नगराध्यक्ष पदाचे उमेदवार योगेश मिसार यांच्यासह प्रभाग क्रमांक १ ते प्रभाग क्रमांक ११ मधील सर्व उमेदवार यावेळी उपस्थित होते. सध्या परिस्थितीत काँग्रेसने प्रचारात फार मोठी आघाडी घेतली असून नगराध्यक्ष पदाचे उमेदवार योगेश मिसार आहेत त्यांच्यासोबत इतरही प्रभागातून नगरसेवक पदासाठी उभे असलेले २३ पैकी २३ उमेदवार हे काँग्रेसचेच असून निश्चितच सर्वच उमेदवार निवडून येतील. त्यात तीळ मात्र ही शंका नाही असा आशावाद ब्रह्मपुरी निर्वाचन क्षेत्राचे आमदार विजय वडेट्टीवार यांनी याप्रसंगी व्यक्त केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here