
अभिमान वाटे सर्वा
संविधान भारताचे,
न्याय ,स्वातंत्र्य, समता
रुप दावी एकतेचे .।।1।।
अखंडत्व भारताचे
संविधान सांगतसे,
देशहित पानोपानी
जग सारे पाहतसे. ।।2।।
गुलामीचा नाश करी
स्वातंत्र्याचे वारे वाही,
भेदभाव विसरून
उजळल्या दिशा दाही. ।।3।।
हक्क सांगत जगास
बंधुत्वाचे बीज पेरी,
लोकशाही अधिकार
प्रगतीचा मार्ग धरी . ।।4।।
भारतीय घटनेचा
जगी झाला बोलबाला,
धर्म ,जाती भेद दूर
जागू सारे कर्तव्याला .।।5।।
सौ. यादव उज्ज्वला राजेंद्र
हडपसर, पुणे.















