
ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून भारत दि १५ ऑगस्ट १९४७ रोजी स्वातंत्र्य झाला.
दि ६ डिसेंबर १९४६ ला संविधान सभेची स्थापना करण्यात आली. संविधान निर्मिती साठी काही समित्या गठीत करण्यात आल्या.
समितीत ३८९ सदस्य सहभागी होते. परंतु पाकिस्तान फाळणी मुळे ते २९९ सदस्य राहिले.
शेवटी संविधान पूर्ण झाल्यावर त्या वर एकूण २८४ स्वाक्षरी कर्ते होते.
डॉ राजेंद्र प्रसाद संविधान समितीतीचे अध्यक्ष होते. तर डॉ भीमराव रामजी आबेडकर हे मसुदा समितीचे अध्यक्ष होते.
डॉ. भीमराव रामजी आबेडकर यांना संविधान समितीत घेण्यासाठी अनेकांनी सुचविले होते.
मसुदा तयार करतांना अनेक देश्यांचे संविधानाचे वाचन करुन व आपल्या अफाट ज्ञानाचा उपयोग डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान मसुदा तयार करतांना केला..
मसुदा हाताने काम लिहिण्याचे काम प्रेम बिहारी नारायण यांनी आपल्या सुंदर अक्षरांनी लिहिले केले.
बी एन. राव हे घटना सल्ल्यागार होते…
दि २६ नोव्हेंबर १९४९ रोजी संविधान पूर्ण झाले.
संविधानाला २ वर्ष ११ महिने व १८ दिवस लागले.
संविधानात
एकूण ..
अनुच्छेद – ३९५ आहेत
भाग – २२ आहेत
अनुसूच्या – १२ आहेत.
संविधान दस्त ऐवज जतन – संसद भवन नवी दिल्ली येथे आहे.
संविधान म्हणजे एखाद्या देशासाठी किंवा राष्ट्रासाठी बनविलेले नियम आणि तत्वाचा समूह आहे, यालाच संविधान किंवा राज्यघटना म्हणतात, जे देशाचे सरकार आणि नागरिकांचे अधिकार आणि कर्तव्य निश्चित करते.
संविधानाचे मुख्य पैलू
* लिखित दस्तऐवज :- भारतीय संविधान हे एक लिखित दस्तऐवज आहे. जो देशाची रचना , अधिकार आणि कर्तव्याची रूपरेषा ठरवतो.
•अंमलबजावणी :- भारतीय संविधान दि. २६ जानेवारी १९५० रोजी लागू करण्यात आले.
* देशाची ओळख :- भारतीय संविधान हे भारताला सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष आणि लोकशाही प्रजासत्ताक म्हणून घोषित करते. तसेच नागरिकांना न्याय, स्वातंत्र्य, समानता आणि बंधुत्वाची हमी देते.
* सण :- दरवर्षी २६ नोव्हेंबर रोजी संविधान दिन साजरा केला जातो.
भारतीय संविधानाचे महत्व आणि वैशिष्ट्ये :-
१. सर्वोच्च कायदा :- भारतीय संविधान हा देशाचा सर्वोच्च कायदा आहे. जो सर्व कायद्याचा आधार आहे. भारतीय संविधान हे देशाची एकता आणि अखंडता दाखवण्याचे काम करते.
२. लोकशाही आणि धर्मनिरपेक्ष :- संविधान भारताला एक लोकशाही आणि धर्मनिरपेक्ष राष्ट्र म्हणून स्थापित करते. नागरिकांना न्याय, स्वातंत्र्य समानता आणि बंधुता देण्याची हमी देते.
३. प्रशासकीय चौकट :- सरकारची रचना, अधिकार आणि कार्य पद्धती ठरविते. यात कायदे मंडळ, आणि न्याय पालिका यांच्यातील संबंध स्पष्ट केले आहेत.
४. नागरिकांचे हक्क आणि कर्तव्ये :- संविधानात नागरिकांचे मूलभूत हक्क( अधिकार) आणि कर्तव्यांची नोंद आहे.
* मूलभूत अधिकार/ हक्क
१. समानतेचा हक्क :- धर्म, वंश, जात, लिंग, किंवा जन्मस्थान या कारणावरून भेदभाव करण्यास मनाई आहे. राज्य, कोणत्याही व्यक्तीस भारताच्या राज्यक्षेत्रात कायद्यामुळे समानता आठवा कायद्याचे संरक्षण नाकारणार नाही.
२. स्वातंत्राचा हक्क :- भाषण व अभिव्यक्ती स्वातंत्र्य, शांततेने व विना शस्त्र एकत्र जमण्याचा, संघ बनविण्याचा, राज्यक्षेत्रात मुक्त संचार करण्याचा, भारताच्या राज्य ्क्षेत्रात कोणत्याही भागात राहण्याचे, कोणतंही पेक्षा आठववं व्यवसाय व्यापार किंवा धंदा चालवण्याचा अधिकार आहे.
३. शोषणाविरुद्ध हक्क :- माणसांच्या अप व्यापार आणि वेठबिगारी यांना मनाई. कारखाने इत्यादीमध्ये बालकांना कामाला मनाई.
४. धर्म स्वातंत्रचा हक्क :- सार्वजनिक सुव्यवस्था, नीतिमता व आरोग्य यांच्या व या भागातील अन्य तरतुदीच्या अधीनतेने, सदसदविवेक बुद्धीच्या स्वातंत्र्याला आणि धर्म मुक्तपणे प्रकट करण्याच्या, आचारण्याच्या व त्याचा प्रचार करण्याच्या अधिकाराला सर्व व्यक्ती सारख्याच हक्कदार आहेत.
५. सांस्कृतिक व शैक्षणिक हक्क :- भारताच्या राज्य क्षेत्रात किंवा त्याच्या कोणत्याही भागात राहणाऱ्या ज्या कोणत्याही नागरिक गटाला आपली स्वतःची वेगळी भाषा, लिपी वा संस्कृती असेल त्याला ती जतन करण्याचा हक्क असेल.
राज्याकडून चालविल्या जाणाऱ्या किंवा राज्य निधीतून सहाय्य मिळत असलेल्या कोणत्याही शैक्षणिक संस्थेत कोणत्याही नागरिकांस केवळ धर्म, वंश, जात, भाषा या किंवा यापैकी कोणत्याही कारणावरून प्रवेश नाकारला जाणार नाही.
धर्म भाषा या निकषनुसार अल्पसंख्याक असलेल्या सर्व वर्गना आपल्या पसंतीच्या शैक्षणिक संस्था स्थापण्याचा व त्याचे प्रशासन करण्याचा हक्क असेल.
६. संविधानिक उपाय योजण्याचा हक्क :- या भागाने प्रदान केलेले हक्क बजावण्याकरिता समुचित कार्यवाहीद्वारे सर्वोच्च न्यायालयास अर्ज विनंती करण्याच्या हक्काची हमी देण्यात आली आहे.
नागरिकांची मूलभूत कर्तव्ये
* संविधानाचे पालन करणे आणि त्याचे आदर्श व संस्था, राष्ट्रध्वज व राष्ट्रगीत यांचा आदर करणे
* ज्यामुळे आपल्या राष्ट्रीय स्वातंत्र्य लढ्यास स्फूर्ती मिळाली त्या उदात्त आदर्शाची जोपासना करुन त्यांचे अनुसरण करणे.
* भारताची सार्वभौमता, एकता व एकात्मता उन्नत ठेवणे व त्यांचे संरक्षण करणे.
•देशाचे संरक्षण करणे व आवाहन केले जाईल तेव्हा राष्ट्रीय सेवा बजावणे.
• धार्मिक, भाषिक व प्रादेशिक किंवा वर्गीय भेदांच्या पलीकडे जाऊन भारतातील सर्व जनतेमध्ये सामंजस्य व बंधुभाव वाढीला लावणे, स्रियांच्या प्रतिष्ठाला उणेपना आणणाऱ्या प्रथाचा त्याग करणे.
* आपल्या संमिश्र संस्कृतीच्या समृद्ध वारशाचे मोल जाणून तो जतन करणे.
* वाने, सरोवरे, नद्या व वन्य जिवसृष्टी यासह नैसर्गिक पर्यावरणाचे रक्षण करुन त्यात सुधारणा करणे, आणि प्राणीमात्राबद्दल दया – बुद्धी बाळगणे.
* विज्ञाननिष्ठ दृष्टिकोन, मानवतावाद आणि शोधकबुद्धी व सुधारणावाद यांचा विकास करणे.
•सार्वजनिक मालमत्तेचे रक्षण करणे व हिंसाचाराचा निग्रह पूर्वक त्याग करणे.
* राष्ट्र सातत्याने उपक्रम व सिद्धी यांच्या चढत्या श्रेणी गाठत जाईल अशा प्रकारे सर्व व्यक्तिगत व समुदाईक कार्यक्षेत्रात पराकाष्ठचे यश संपादन करण्यासाठी झटणे.
* जो जन्मदाता असेल किंवा पालक असेल त्याने, आपल्या अपत्यास अथवा पाल्यास, त्याच्यात वयाच्या सहाव्या वर्षांपासून ते चौदाव्या वर्षा पर्यंत शिक्षणाची संधी उपलब्ध करुन देणे.
हीं प्रत्येक भारतीय नागरिकांची कर्तव्य असतील.
भारत देशात अनेक धर्म, जाती , भाषा,वंश व विविध संस्कृती असूनही फक्त संविधान पालन केल्याने भारत देशाची एकता एकात्मता अखंडता जतन केल्या जाते
जय भारत ! जय संविधान!!
अखंड भारत चिरायू होवो.
सुनंदा निकम धुळे
से. नि. आरोग्य पर्यवेक्षक















