prabodhini news logo
Home कविता प्रबोधिनी मंच महाराष्ट्र साहित्य समूह तर्फे विशेष कविता – भारतीय संविधान

प्रबोधिनी मंच महाराष्ट्र साहित्य समूह तर्फे विशेष कविता – भारतीय संविधान

0
91

संविधान तयार करण्या ,
दोन वर्ष, महिने अकरा ,
आणिकही दिवस अठरा,
होते लागले , त्या घटनेला.

एकोणीसशे पन्नास साली ,
राज्यघटना लागूस झाली.
त्यापूर्वी सव्वीस नोव्हेंबरी,
ती स्वीकारण्यात आली होती.

संविधान दिन म्हणून तो ,
दोन हजार पंधरा साली ,
सव्वीस नोव्हेंबर दिनासी,
प्रथम साजरा झाला देशी.

डाॅ. आंबेडकर हे अध्यक्ष ,
संविधान लागू करण्यास .
प्रेम बिहारी यांचे लिखित ,
लागू सव्वीस जानेवारीस.

एकोणीसशे पन्नास तेव्हा,
भारताचा सर्वोच्च कायदा ,
राजकीय संहिता मान्यता ,
मूलभूत अधिकार सर्वां .

लोकांनी लोकांसाठी असावे,
समभाव , बंधुता नांदावे .
अस्पृश्यतेस दूर सारावे,
संविधान ‘ एकता ‘ सांगते.

डाॅ. सौ. स्मिता सदानंद मुकणे .
ठाणे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here