prabodhini news logo
Home कविता प्रबोधिनी मंच महाराष्ट्र साहित्य समूह तर्फे विशेष कविता – संविधान दिन

प्रबोधिनी मंच महाराष्ट्र साहित्य समूह तर्फे विशेष कविता – संविधान दिन

0
117

संविधानाचे शिल्पकार
डॉ. बाबासाहेब आंबेडकर
दिला मूलभूत अधिकार
करू त्यांचा जय जयकार

माझ्या भारताची राज्यघटना
दिले नागरिकांना अधिकार
झाली निर्धारित कर्तव्ये
मार्गदर्शक तत्वांचा विचार

पूर्ण स्वराज्याचे स्वप्न साकार
तोच दिन लाभला संविधानास
माझा भारत देश आहे महान
जोपासू संस्कृती परंपरा खास

वैयक्तिक हक्कांचे रक्षण
नागरिकांनी राखावे भान
संविधान दिन करू साजरा
सदैव राहील भारताची शान

सौ वंदना शशिकांत पाटील

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here