prabodhini news logo
Home ठळक बातम्या युनियन बँक अंकली शाखेच्या अन्यायाविरोधात हलगी-नाद आंदोलनात जनक्षोभ उसळला – बँक व्यवस्थापनाला...

युनियन बँक अंकली शाखेच्या अन्यायाविरोधात हलगी-नाद आंदोलनात जनक्षोभ उसळला – बँक व्यवस्थापनाला दोन दिवसांचा अल्टिमेटम!

0
286

दस्तऐवज न दिल्यास “10 डिसेंबर आंतरराष्ट्रीय मानव हक्क दिना” पासून पीडित कर्मचारी ‘ऋषिकेश राजू कांबळे’ “आमरण उपोषणास” बसणार — जिवीत्वाला धोका निर्माण झाल्यास बँक जबाबदार!

सांगली प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज नेटवर्क – दि. ०८/१२/२०२५ युनियन बँक ऑफ इंडिया, शाखा अंकली यांनी पीडित कर्मचारी ऋषिकेश राजू कांबळे यांना अन्यायकारक व बेकायदेशीरपणे सेवेतून कमी केल्याच्या निर्णयाविरोधात “26 नोव्हेंबर संविधान दिनापासून” सुरू असलेल्या बेमुदत धरणे आंदोलनाच्या तेराव्या दिवशी, दिनांक 08/12/2025, दुपारी 2.00 ते 6.00 दरम्यान जोरात “हलगी-नाद आंदोलन” पार पडले.

शाखेसमोर उसळलेल्या घोषणांनी परिसर दणाणून गेला. शाखाधिकारी हेमंतकुमार शिंदे यांची सलग पाच दिवसांची अनुपस्थिती आणि बँक प्रशासनाची दखल न घेण्याची भूमिका यामुळे जनआक्रोश अधिक वाढला.

आंदोलनाचा ठिकाणी, गुरप्रीत सिंग डेप्युटी रीजनल हेड तसेच सिबिल प्रधान असिस्टंट जनरल मॅनेजर रिजनल ऑफिस कोल्हापूर हे उपस्थित होते. त्यांनी व युनियन बँक ऑफ इंडिया शाखा अंकली शाखाधिकारी हेमंतकुमार शिंदे यांनी आंदोलकांशी कोणती सकारात्मक चर्चा न केवळ दिशाभुलीचे उडवाउडवीची उत्तरे दिली आहे. कायदेशीर ठोस पावले उचलली नाहीत. सेंट्रल ऑफिसचे कोणतेच कागदपत्र सादर केलेले नाहीत. त्यामुळे आंदोलकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.

नेत्यांचे तीव्र भाषण रीजनल ऑफिस कोल्हापूरला खुला इशारा

या आंदोलनात वंचित बहुजन आघाडीचे सांगली जिल्हाध्यक्ष नितीन सोनवणे,
वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियनचे पश्चिम महाराष्ट्र महासचिव प्रशांत वाघमारे, सांगली जिल्हा संपर्कप्रमुख संजय भूपाल कांबळे
तसेच अंकली गावातील सामाजिक कार्यकर्ते प्रदिप कांबळे यांनी प्रभावी भाषण करत युनियन बँक व्यवस्थापनास कठोर शब्दांत इशारा दिला.
त्यांनी स्पष्ट मागणी केली की दोन दिवसांच्या आत खालील दस्तऐवज पीडित कर्मचारी ऋषिकेश कांबळे यांना तात्काळ द्यावेत

1. त्यांना कामावर असताना सेवेतून कमी करण्यासंदर्भातील “सेंट्रल मुख्य अधिकारी” यांचे लेखी आदेशपत्रशाखा ते वरिष्ठ पत्रव्यवहार, RO/ZO/CO नोटिंग, सर्व्हिस रेकॉर्ड, टर्मिनेशनची नोंद, निर्णयपत्र

2. त्यांच्याविरोधात केलेल्या इतर सर्व हालचालींची संपूर्ण अधिकृत कागदपत्रे

अन्यथा बुधवार, दिनांक 10 डिसेंबर 2025 — जागतिक मानवाधिकार दिनापासून पीडित कर्मचारी “आमरण उपोषणास” बसणार आहेत.
यावेळी , त्यांच्या जिवीत्वाला धोका निर्माण झाल्यास बँक व्यवस्थापन जबाबदार! नेत्यांनी स्पष्ट इशारा दिला की, “आमरण उपोषणादरम्यान ऋषिकेश कांबळे यांच्या जिवीत्वाला जर किंचितही धोका निर्माण झाला, तर त्यास पूर्णतः बँक शाखा व्यवस्थापक, रीजनल ऑफिस कोल्हापूरचे अधिकारी आणि संपूर्ण युनियन बँक प्रशासन जबाबदार राहील.”

या संदर्भात लेखी निवेदनही बँक प्रशासनास तसेच पोलीस आणि जिल्हाधिकारी कार्यालयास देण्यात आले आहे.
हलगी-नाद आंदोलनात उपस्थित मान्यवर

• नितीन सोनवणे — जिल्हाध्यक्ष, वंचित बहुजन आघाडी
• प्रशांत वाघमारे — पश्चिम महाराष्ट्र महासचिव, माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियन
• संजय भूपाल कांबळे — जिल्हा संपर्कप्रमुख
• संजय संपत कांबळे — जिल्हाध्यक्ष
• अनिल मोरे – महासचिव
• अनिल सावंत — प्रवक्ता
• महोन साबळे — उपाध्यक्ष, सांमिकु शहर महानगरपालिका
• रूपेश तामगावकर, प्रदिप कांबळे, गौतम भगत, जगदिश कांबळे, किशोर आढाव,
• किरण कांबळे – शिवसेना मिरज तालुका अध्यक्ष , महोन गवळी, दशरथ गायकवाड, वैभव कांबळे, प्रतीक सदामते, प्रल्हाद कांबळे, दिपक कुरणे, बाळासाहेब कांबळे, देवयानी कांबळे, सतीश कांबळे, लक्ष्मी ठोकळे
यांसह वंचित बहुजन माथाडी युनियनचे पदाधिकारी, कार्यकर्ते, वंचित बहुजन आघाडीचे सदस्य तसेच अंकली ग्रामस्थांचा मोठा जनसमुदाय उपस्थित होता.

आदरणीय ॲड. प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांनी श्रमिक कष्टकरी कामगार – कर्मचारी यांच्या न्याय हक्कासाठी लढा देण्यासाठी निर्माण केलेली एकमेव कामगार संघटना म्हणजे वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियन महाराष्ट्र राज्य या संघटनेची ठाम भूमिका पष्ठ आहे.

वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियन सांगली यांच्या वतीने जाहीर करण्यात येते की,
“पीडित कर्मचारी ऋषिकेश कांबळे यांना न्याय मिळेपर्यंत आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल.
दस्तऐवज न दिल्यास आमरण उपोषण आणि तीव्र लोकशाही लढा अटळ आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here