prabodhini news logo
Home कविता प्रबोधिनी मंच महाराष्ट्र साहित्य समूह तर्फे विशेष कविता – डॉ. बाबासाहेब...

प्रबोधिनी मंच महाराष्ट्र साहित्य समूह तर्फे विशेष कविता – डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन

0
100

ज्ञानाचा सागर महामानव
प्रज्ञासूर्य उगवला भिमराव
माता भिमाई पिता रामजी
जन्मा आले १८९१ रोजी—!!

भेद भाव संपविण्या संघर्ष
दिन-दलीतांच्या सेवेत हर्ष
झोकून दिले स्वतःला कार्यात
शांतीचा मार्ग धरुन समतेत—!!

पुण्याई होती भिमाची महान
संविधानाने मिळाला सन्मान
मानवतेचा दीपस्तंभ आधार
श्रेष्ठ डॉ.बाबासाहेब आंबेडकर —!!

जनतेचा बाप खळखळता सागर
झाला अंधार मावळला सूर्यप्रखर
काळरात्र सहा डिसेंबरला दुःख
ज्ञान ज्योत समाजाला देऊन सुख—!!

लाखोंचा जनसागर हळहळला
भारत भूमीवर भिम हिरा हरवला
ज्ञानाची ज्योत विझली क्षणात
वसे हृदयात स्थान जनमनात—!!

करुन मानवंदना चरणी अर्पावा
कोटी कोटी प्रणाम तुम्ही घ्यावा
सलाम महान कर्तृत्ववाला स्मरुन
महापरिनिर्वाण दिन विनम्र अभिवादन —!!

सौ.सविता संजय भोयर
राजुरा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here