prabodhini news logo
Home कविता प्रबोधिनी मंच महाराष्ट्र साहित्य समूह तर्फे विशेष कविता – डॉ. बाबासाहेब आंबेडकर...

प्रबोधिनी मंच महाराष्ट्र साहित्य समूह तर्फे विशेष कविता – डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन

0
101

द्वेष मत्सराने
पोखरला हा समाज
अस्पृश्य अस्पृश्यतेचा कलंक
जातीयतेचा वाढला होता माज…

मानवतेचा सुंदर वृक्ष
जातीयतेची पानगळ
अंधारलेल्या जीवनाच्या वाटा
उच्च निचतेचा खुळ….

क्षणाक्षणाचे रणकंदण
गावगाडा होता बेकार
छळती मानवास मानव
जगणेच होते बेकार…

भीम ज्ञानाचा प्रकाश
मार्ग सत्याचा बुद्धांचा
उपकार या भारताला
संविधान रुपी मानवतेचा….

कोटी कोटी उपकार
लिहिता लेखणी थकली माझी
विनम्र अभिवादन बाबासाहेबांना
जिंदगी सलामात आली माझी….

भीम कोहिनूर हिरा
ज्ञानाची ज्ञानगंगा
भीम माझा लय उपकारी
महती पुढच्या पिढीला सांगा…

आदरांजली बा भिमाला
शीश झुकवितो मनोज
विनम्र अभिवादन ज्ञान सूर्याला
गौरवाणे सजलाय भारताचा ताज

गायकवाड मनोज रामचंद्र
शहापूर जिल्हा ठाणे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here