
गोंड समाज तथा बिरसा सेना बचतगट डोंगरगाव सा. यांच्या वतीने जिल्हा स्तरीय गोंडी नृत्य स्पर्धा तथा गोंडी सांस्कृतिक महोत्सव २०२५ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून मा. जयश्री कावळे संचालिका कृ.उ.बा.स.सिंदेवाही, कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून मा. राहुल बोडणे सरपंच ग्रा.पं. नवरगाव, कार्यक्रमाचे विशेष अतिथी म्हणून गोंडी गायक सुरेश वलादी, राहुल कन्नाके सर यवतमाळ, माधुरीताई सुरपाम सरपंच, रमाकांतभाऊ लोधे तालुका अध्यक्ष का. क. सिंदेवाही, सुनिल पेंदाम, मिलिंद कोवे, घनश्याम पेंदाम, मुरली मडावी, योगेश लोंढे पो. पा., गणेश हांडेकर त.मु. स.अध्यक्ष, शिल्पा बन्सोड, नकुल पेंदाम आदी मान्यवरांच्या उपस्थित पार पडले. कार्यक्रमाप्रसंगी स्पर्धेचे परीक्षक सुरेशदादा वेलादी सर यांनी गोंडी संस्कृतीचे जतन, संवरक्षण, आणि गोंडी संस्कृती टिकविण्यासाठी युवापिढीने पुढाकार घ्यावा असे मार्गदर्शन केलेत. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रुपेश सुरपाम, प्रशांत मडावी, बिरसा सेना बचतगटाचे सर्व सभासद तसेच गोंड समाजाच्या सर्व महिला पुरुषांनी सहकार्य केलेत. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिनेश वलके, दिलेश सहारे यांनी केला तर पाहुण्यांचे आभार निकेश वेटे यांनी मानलेत. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी करण सुरपाम, प्रणय हांडेकर, तसेच सर्व डोंगरगाव वासीय जनतेनी सहकार्य केलेत.















