prabodhini news logo
Home चंद्रपूर माना रोड–इरई नदी परिसरात वाघाचा हल्ला..

माना रोड–इरई नदी परिसरात वाघाचा हल्ला..

0
119

गाईचा बछडा ठार, गाय जखमी..

अमोल शेंडे यांच्या पुढाकाराने वनविभागाकडून तात्काळ कारवाई..

चंद्रपूर प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज नेटवर्क – माना रोड येथील इरई नदी परिसरात वाघाने गाईच्या बछड्यावर हल्ला करून त्यास ठार केले असून गाईला गंभीर दुखापत झाल्याची घटना घडली आहे. या घटनेची माहिती प्रभागातील रहिवासी राजू गजर यांनी अमोल शेंडे यांना दिली.
माहिती मिळताच अमोल शेंडे यांनी तात्काळ वनविभागाचे आरएफओ नायगमकर यांच्याशी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधला. त्यांच्या सूचनेनुसार वनरक्षक प्रदीप कोडापे व वनमजूर जलील शेख यांनी घटनास्थळी भेट देत पंचनामा केला. सदर प्रकरण मदती व भरपाईसाठी शासनाकडे पाठवण्यात आले आहे.
वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी या परिसरात वाघाचा संचार असल्याचे निष्पन्न केल्याचे सांगत, पंचनाम्यानंतर बाधित पशुधनधारकास तात्काळ भरपाई मिळवून देण्यासाठी सहकार्य केले जाईल, अशी ग्वाही दिली आहे.
या घटनेच्या पार्श्वभूमीवर अमोल शेंडे यांनी नागरिकांना सतर्कतेचे आवाहन केले आहे. नागरिकांनी एकटे फिरणे टाळावे, विशेषतः पहाटे व सायंकाळच्या वेळी बाहेर जाणे टाळावे. आवश्यक असल्यास किमान चार ते पाच जणांनी एकत्र फिरावे व सोबत काठी बाळगावी, असेही त्यांनी सांगितले.
स्थानिक नागरिकांच्या सुरक्षेसाठी वनविभाग व प्रशासनाशी सातत्याने समन्वय ठेवून आवश्यक त्या उपाययोजना करण्याचा निर्धार अमोल शेंडे यांनी व्यक्त केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here