prabodhini news logo
Home ठळक बातम्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वक्तव्याचा भीम आर्मी कडून जाहीर निषेध

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वक्तव्याचा भीम आर्मी कडून जाहीर निषेध

0
448

लातूर प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज नेटवर्क – पीएचडी करण्यासाठी दरमहा 41 हजार रुपये मिळतात त्यासाठी एकाच कुटुंबातील आनेक जण शिष्यवृत्तीसाठी पीएचडी करत आहेत या विधानाचा भीम आर्मी भारत एकता मिशन कडून माजी मराठवाडा अध्यक्ष विनोद कोल्हे यांनी तीव्र निषेध व्यक्त केला, शिष्यवृत्ती ही मागासवर्गीय विद्यार्थ्याला शिक्षण पूर्ण करण्यासाठी भेटते मग एकाच कुटुंबातील अनेक व्यक्ती जर पीएचडी करत असतील तर शासनाने याचा अभिमान बाळगला पाहिजे मागासवर्गीय कुटुंबातील व्यक्ती हे पीएचडी करून आपल्या कुटुंबाची आणि समाजाची परिस्थिती बदलण्याचा प्रयत्न करत आहेत परंतु मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी शिक्षणच घेऊ नये असे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना वाटत आहे का ? मागासवर्गीय विद्यार्थी हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या मूलमंत्र, शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे जो कोणी प्राशन करेल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही, मागासवर्गीय विद्यार्थी हे हे शिक्षण वाघिणीच्या दुधाप्रमाणे प्राशन करत आहे आहेत ते भविष्यात अन्याय अत्याचाराच्या विरोधात गुरगुर करू नये यासाठी उपमुख्यमंत्र्यांनी हा विषय छेडला असावा परंतु उपमुख्यमंत्र्याच्या घरात सगळे लोक राजकारणात आहेत राजकारणातून पैसा कमवत आहे हे त्यांना चालतं का लोकांनी शिक्षण घेऊ नये शिक्षणातून प्रगती करू नये परंतु तुम्ही मात्र सर्व कुटुंबातील अनेक आणि राजकारण करावे हे योग्य आहे का असा प्रश्न भीम आर्मीचे माजी मराठवाडा अध्यक्ष विनोद कोल्हे यांनी केला…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here