prabodhini news logo
Home कारंजा संत गजानन महाराजांच्या सामुहिक पारायणाकरीता सहभागी होण्याचे भाविकांना विनम्र आवाहन

संत गजानन महाराजांच्या सामुहिक पारायणाकरीता सहभागी होण्याचे भाविकांना विनम्र आवाहन

0
90

शारदा भुयार वाशिम जिल्हा प्रतिनिधी – कारंजा (लाड): रविवार,दि.११ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ०९:०० ते दुपारी ०४:०० वाजेपर्यंत, कारंजा (लाड) येथील शहर पोलीस स्टेशन आवारातील,श्री.संत गजानन महाराज मंदिरात,पारायण वाचक हभप. पुष्पलता गुलाबराव गावंडे यांच्या अमृतमय वाणीमधून एकदिवसीय संत गजानन विजय ग्रंथांचे सामुहिक पारायण आयोजीत केले असून,या सामुहिक पारायणात मोठ्या संख्येने माऊली भक्तांनी सहभागी होण्याचे आवाहन सेवाधारी मंडळी कडून करण्यात आले आहे.याबाबत सविस्तर वृत्त असे की,आज समस्त अखिल विश्वात,श्रीक्षेत्र शेगाव येथील श्री.संत गजानन महाराजांचे करोडो-अब्जो भाविक अनुयायी असून,हे सर्व सेवाधारी माऊली म्हणून ओळखल्या जातात.माऊली श्री.गजाननाच्या कृपाप्रसादामुळे माऊली भक्तांनाही माऊली म्हणूनच ओळखल्या जाते.त्यामुळे माऊली शब्दातच अखिल ब्रम्हांड सामावलेले आहे.आणि त्यामुळे अशा माऊलीच्या भक्ती व आराधनेसाठी आणि श्री.संत गजानन महाराजांनाच नव्हे तर आपल्या स्वतःच्या अंतर्मनाला प्रसन्न करून घेण्यासाठी आणि आपल्या घरात सुख,शांती, प्रसन्नता व आनंद राहावा. यासाठी श्री. संत गजानन महाराजांच्या पवित्र ग्रंथाच्या पारायणाची परंपरा चालत आलेली आहे.कारंजा (लाड) येथील नगर पालिकेच्या इमारती जवळ,शहर पोलीस स्टेशनच्या आवारात श्री.संत गजानन महाराजांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेल्या पवित्र भूमीवर,सर्वात पुरातन आणि कारंजा शहरातील पहिलेच श्री. संत गजानन महाराज मंदिर आहे.दररोज येथे नित्यनियमाने,श्रीक्षेत्र शेगाव प्रमाणे पूजाविधी पार पाडले जात असतात.शिवाय दर गुरुवारी सार्यकाळी महाआरतीनंतर,इच्छुक भाविकांच्या ऐच्छिक देणगी मधून,महाप्रसादाचा कार्यक्रम श्री.संत गजानन महाराज सेवाधारी मंडळाकडून पार पडत असतो.त्यामुळे दर गुरुवारी कारंजा शहराच्या कानाकोपर्यातून भाविक मंडळी दर्शनाला येत असतात.लाखो भाविकांची येथील रेलचेल पहाता दर गुरुवारी आनंदसोहळ्या निमित्त मंदिराला यात्रेचे स्वरूप येत असते.अशा ह्या माऊलीच्या जागृत श्री.गजानन महाराज मंदिरांमध्ये येत्या दि.११ जानेवारी २०२६ रविवार रोजी सकाळी ०९:०० वाजेपासून दुपारी ०४:०० वाजेपर्यंत एकदिवशीय, एकवीस अध्यायी श्री. संत गजानन महाराज विजय ग्रंथाचे विराट असे सामुहिक पारायण करण्याचे आयोजीत केले आहे.तरी या शुभ प्रसंगी जास्तित जास्त माऊली भाविकांनी पारायणामध्ये सहभागी होण्याचे आवाहन श्री.संत गजानन महाराज मंदिर सेवाधारी मंडळ कारंजाकडून करण्यात येत आहे.
त्यासाठी कारंजा शहर पोलीस स्टेशन आवारातील श्री. संत गजानन महाराज मंदिरामध्ये पारायणाला बसणाऱ्या माऊली भक्तांची नोंदणी सुरू आहे. पारायणानंतर दुपारी ०५:०० वाजता महाप्रसाद होईल. त्यामुळे इच्छुक माऊली भाविकांनी पारायणाला बसण्याकरीता मंदिर कार्यालयात येऊन आपल्या नावाची रीतसर नोंदणी करून घ्यावी.असे वृत्त कळविण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here